Vande Bharat : वंदे भारतचा दरवाजा बंद झाला अन् तुम्ही आतच अडकलात? टीसीला शोधू नका, जीव वाचवण्यासाठी करा 'हे' काम

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे दरवाजे ऑटोमॅटिक लॉक झाल्यानंतर तुम्ही आत अडकलात तर घाबरू नका. 'इमर्जन्सी टॉक बॅक' बटणाचा वापर करून थेट लोको पायलट किंवा गार्डशी संपर्क साधता येतो.
Nanded Mumbai Vande Bharat
Nanded Mumbai Vande BharatSaam tv
Published On

Vande Bharat Train Rule : वंदे भारत एक्सप्रेस जितकी हायटेक आहे, तितकेच तिचे नियमही कडक आहेत. ही ट्रेन सुरू होण्यापूर्वीच दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होतात. पण तुमचे स्टेशन आले असताना किंवा कोणाला सोडायला गाडीत चढल्यावर अचानक दरवाजा बंद झाला आणि तुम्ही आतच अडकलात तर काय करायचे? अशा वेळी सर्वात आधी घाबरू नका. वंदे भारतमध्ये प्रत्येक कोचमध्ये 'इमर्जन्सी टॉक बॅक' (Emergency Talk Back) बटण असते. ते दाबून तुम्ही थेट ट्रेनच्या ड्रायव्हर किंवा गार्डशी बोलू शकता आणि तुमची समस्या सांगू शकता.

लक्षात ठेवा, चालत्या ट्रेनचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. तसेच, विनाकारण इमर्जन्सी चेन ओढल्यास कायदेशीर कारवाई आणि मोठा दंड होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा आणि तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. टीसीला शोधण्याचीही गरज नाही. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेले 'इमर्जन्सी टॉक बॅक' बटण दाबा.

Nanded Mumbai Vande Bharat
सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी; 'या' सरकारने सुरू केली अनोखी योजना

जर तुम्हाला वंदे भारत ट्रेनमधून उतरता येत नसेल आणि ट्रेन आधीच निघाली असेल, तर अशा परिस्थितीत काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे. घाबरून साखळी कधीही ओढू नका, कारण असे करणे गुन्हा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्नही करू नका. जर ट्रेन आधीच निघून गेली असेल आणि तुम्ही अजूनही आत असाल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला तिकीट नसलेले मानले जाईल. दरवाजे बंद झाल्यावर तुम्ही आपत्कालीन टॉक बॅक बटण वापरू शकता. ते थेट लोको पायलट आणि ट्रेन कर्मचाऱ्यांशी जोडलेले आहे. जर ट्रेन स्टेशनवर असेल, तर दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Nanded Mumbai Vande Bharat
सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचं दर बदलले! प्रति तोळा इतके झाले, चांदी थेट ३,००० रुपयांनी महागली; पाहा आजचे नवे दर

काय करायला हवे?

वंदे भारत निघाली असेल अन् तुम्ही आतच अडकला असाल, तर तुम्ही टीटीईशी बोला आणि त्यांना सर्व काही समजावून सांगा. अशा प्रकरणांमध्ये दंडही आकारला जाऊ शकतो. दंड भरल्यानंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर, प्रवाशाला स्थानकावर उतरण्याची परवानगी मिळते. त्यामुळे, अशा परिस्थितीत घाबरून जाऊन चुकीचे पाऊल उचलणे टाळावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

Nanded Mumbai Vande Bharat
Good News: नागपूर अन् कोकणसाठी मुंबईतून धावणार स्पेशल ट्रेन; कुठे थांबणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com