सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचं दर बदलले! प्रति तोळा इतके झाले, चांदी थेट ३,००० रुपयांनी महागली; पाहा आजचे नवे दर

Gold Price Today : सोनं आणि चांदी दराच्या घसरणीनंतर सराफा बाजारात अचानक तेजी आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४३ हजारांच्या पार पोहोचला आहे. तर चांदी सव्वा दोन लाखांवर गेल्याचे पाहायला मिळाले.
Gold Price Today
Gold Price TodaySaam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. सुवर्णनगरी जळगावात आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी दरवाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात प्रति किलो ३ हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये आणि व्यापारी वर्गात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरत असल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी होत होती. मात्र, आज सकाळी मार्केट सुरू होताच बाजाराने पुन्हा उसळी घेतली असून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कडाडले आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडी आणि बाजारपेठेतील मागणीमुळे ही दरवाढ झाली असण्याची शक्यता आहे.

Gold Price Today
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशांबाबत सरकारचा मोठा झटका; 'या' महिलांवर होणार थेट कारवाई

जळगावमधील आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर:

२२ कॅरेट सोने (22K Gold): ₹ १,३१,१७० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोने (24K Gold): ₹ १,४३,२०० प्रति १० ग्रॅम

चांदी (Silver): ₹ २,२७,००० प्रति किलो

Gold Price Today
Crime : नागपुरात थरार! घटस्फोटाचा निकाल लागताच २४ वर्षीय तरुणीची हत्या; भररस्त्यात गळा, पोटावर सपासप वार

ग्राहकांमध्ये संभ्रम, खरेदीवर होणार परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून बाजारात मंदीचे सावट असल्याने अनेक ग्राहक दर आणखी कमी होतील या आशेने वाट पाहत होते. मात्र, २ दिवसांपासून अचानक झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले असून बाजारात काहीसा संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे ही दरवाढ झाली आहे. आगामी काळात ही तेजी अशीच कायम राहणार की दरात पुन्हा घसरण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Price Today
Maharashtra politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com