Good News: नागपूर अन् कोकणसाठी मुंबईतून धावणार स्पेशल ट्रेन; कुठे थांबणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nagpur special train : मध्य रेल्वेने मुंबई (सीएसएमटी) ते नागपूर आणि करमळी (कोकण) दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. मार्ग, थांबे, वेळापत्रक, बुकिंगची माहिती आणि प्रवासाचे संपूर्ण वेळापत्रक येथे जाणून घ्या.
Good News:
Special TrainSaam Tv
Published On

Central Railway, Mumbai special train : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने कोकण आणि नागपूरसाठी ४ विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन मुंबई (CSMT) ते करमळी (कोकण) आणि नागपूर दरम्यान या गाड्या धावतील. यामध्ये CSMT-करमळी विशेष ट्रेन (01129) २६ जून रोजी धावली, तर करमळी-CSMT ट्रेन (01130) २८ जून रोजी सुटेल. तसेच, नागपूरसाठी ट्रेन क्र. 01021 आणि 01022 आज २७ जून रोजी दोन्ही दिशांनी धावणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग IRCTC आणि 'RailOne' ॲपवर उपलब्ध असून, अनारक्षित तिकिटे UTS प्रणालीद्वारे मिळतील. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळेची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष साप्ताहिक गाड्या - (२ सेवा)

गाडी क्र. 01129 विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २६.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १४.४० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01130 विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २८.०६.२०२६ रोजी करमळी येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

Good News:
सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी; 'या' सरकारने सुरू केली अनोखी योजना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष साप्ताहिक गाड्या - (२ सेवा)

गाडी क्र. 01021 विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २७.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01022 विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २७.०६.२०२६ रोजी नागपूर येथून २१.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

Good News:
सुवर्णनगरीत सोन्या-चांदीचं दर बदलले! प्रति तोळा इतके झाले, चांदी थेट ३,००० रुपयांनी महागली; पाहा आजचे नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com