भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन पॉलिसी राबवत असतात. एलआयसी लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पॉलिसी राबवत असतात. ज्यामध्ये तुम्हाला भरघोस परतावा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीबद्दल माहिती देणार आहोत. ज्यात तुम्ही दररोज ४५ रुपयांची गुंतवणूक करुन २५ लाख रुपये मिळवू शकतात.
जर तुम्हाला कमी गुंतवणूक करुन जास्त परतावा मिळवायचा असेल तर जीवन आनंद पॉलिसी तुमच्यासाठी उत्तम पर्या. आहे. ही एक टर्म पॉलिसी आहे. पॉलिसीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत प्रीमियम भरु शकता. या पॉलिसीमध्ये तुम्हाला अनेक लाभ मिळू शकतात. जीवन आनंद पॉलिसीमध्ये १ लाख रुपयांनी विमा रक्कम दिली जाते.
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीअंतर्गत तुम्ही रोज ४५ रुपये म्हणजे एका महिन्याला १३५८ रुपये जमा करुन २५ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेची पॉलिसी टर्म १५ ते ३५ वर्ष आहे. तुम्ही या पॉलिसीअंतर्गत ४५ रुपयांची बचत ३५ वर्षांसाठी करु शकता. यानंतर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही दर महिन्याला १३५८ रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षात १६,३०० रुपये जमा होतील. तुम्ही ३५ वर्ष ही रक्कम गुंतवली तर ती ५,७०,५०० रुपये होईल. म्हणजेच तुमच्या विम्याची रक्कम ५ लाख रुपये असेल. यावर तुम्हाला ८.६० लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि ११.५० लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल. LIC च्या जीन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.