Success Story: RBI ची नोकरी सोडली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा

Success Story Of IAS Nidhi Choudhary: महाराष्ट्राच्या निधी चौधरी यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत करतो. परंतु कधीतरी आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपल्याला स्वप्नांना मागे सोडून काहीतरी वेगळं करावं लागतं. परंतु आयुष्यात पुन्हा एकदा स्वप्न पूर्ण करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. असंच काहीसं निधी चौधरी यांच्यासोबत झालं. त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. (Success Story)

Success Story
Success Story: आईला कॅन्सर, आर्थिक अडचण, शेतकऱ्याच्या पोरीनं जिद्द सोडली नाही; महिनाभरात तयारी, युपीएससी क्रॅक, IAS मनिषा आव्हाळेंचा प्रवास

निधी चौधरी या महाराष्ट्र कॅडरच्या २०१२ च्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मूळच्या नागपूरच्या रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी हिंदी मीडियममधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.यानंतर त्यांनी बीएमधून ग्रॅज्युएशन केले. (Success Story Of IAS Nidhi Choudhary)

ग्रॅज्युएशन करतानादेखील त्या नेहमी कॉलेजमध्ये टॉपर होत्या. त्यांनी लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास या विषयात एमए डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी आरबीआय ग्रेड बी परीक्षादेखील उत्तीर्ण केली. त्यांनी काही काळ रिझर्व्ह बँकेत मॅनेजर पदावर कामदेखील केले होते.

याच काळात त्यांचे लग्न झाले. त्यांची बहिण विधी चौधरी या आयपीएस बनल्या. त्यांनी २००८ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.यामुळेच त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनीदेखील यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Success Story
Success Story: स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली;६ महिने स्वतःला बंद करुन घेतले; तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS निधी सिवाच यांची सक्सेस स्टोरी

निधी यांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. त्यांनी २०१० साली ६७८रँक मिळवली होती.परंतु त्यांना आयएएस पोस्ट मिळाली नाही. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांनी १४५ रँक मिळवली. त्यांना आयएएस पोस्ट मिळाली. त्यांनी खूप कमी वयात चांगले यश मिळवले.

Success Story
Success Story: IIT मधून शिकला, दोनदा UPSC क्रॅक, देशात पहिला आला; IAS शुभम कुमार यांची सक्सेस स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com