Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डीझेलचे नवे दर जाहीर , तुमच्या शहरातील भाव काय? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today (१६ जुलै 2024): आपल्यापैंकी प्रत्येकजण सकाळी घराबाहेर पडताच पेट्रोल- डिझेलचे दर पाहत असतो. दरदिवशी या किंमती बदलत राहतात.चला तर आजचे दर पाहूयात.
Petrol Diesel Price Today (१६ जुलै 2024)
Petrol Diesel Price Today Saam Tv
Published On

सध्या आपण पाहिल की दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही वर्षाआधी हे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा परिणाम सर्वसामान्यांना होत नसे. परंतू आता प्रवास जवळचा असो वा दूरचा अनेक प्रवासी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने घराबाहेर पडतात. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही बदल झाला आहे की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Petrol Diesel Price Today (१६ जुलै 2024)
One Nation One Gold Rate: सोन्याचे दर लवकरच घसरणार? देशभरात असणार एकच भाव; काय आहे केंद्र सरकारचं नवं धोरण?

जर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होत असतात. आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहिले असेल पेट्रोल आणि डिझेलच्या भावात फारसा बदल (change)झालेला नसला तरी आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत चालत आहे. परिणामी वाहनधारकांच्या खिशाल चांगलाच फटका बसत आहे.

सर्वांनाच माहिती असेल पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या कच्च्या तेलाच्या किंमतीवरुन ठरवल्या जातात. पेट्रोल आणि डिझेल किंमतीसह रोज आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या नवीन किंमतीही जाहीर होतात. चला तर मग आज जाणून घेऊयात महाराष्ट्रातील(maharashtra) पेट्रोल आणि डिझेलचे आजचे भाव.

मुंबईत(Mumbai) पेट्रोल १०३.४४ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे.

कोलकत्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये लिटर तर डिझेलचा दर ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९२.३५ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर

वाशिममध्ये पेट्रोल - १०४.९९रुपये

वर्धामध्ये पेट्रोल - १०४.९२रुपये

सातारामध्ये (Satara)पेट्रोल - १०५.३४ रुपये

परभणीमध्ये पेट्रोल - १०६.७१ रुपये

कोल्हापूरमध्ये पेट्रोल - १०४.३९ रुपये

Petrol Diesel Price Today (१६ जुलै 2024)
MS Dhoni Car-Bike Collection: एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार; पाहा संपूर्ण कलेक्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com