Mumbai Breaking: मोठी बातमी! मुंबई विमानतळावर २ कोटींचा गांजा जप्त; खेळण्यांमधून सुरू होती तस्करी

Air Intelligence Seized Ganja Worth Rs 2 crore: मुंबईतून गांजाच्या तस्करीसंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय.
मुंबई विमानतळावर २ कोटींचा गांजा जप्त
Ganja SiezedSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने कारवाई मोठी कारवाई केलीय. एअर इंटेलिजन्सच्या युनिटने तब्बल दोन कोटी रुपयांचा गांजा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त केलाय. बँकॉकवरून आलेल्या महिलेकडून गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. आपण याबाबत सविस्तर वृत्त जाणून घेवू या.

काय आहे प्रकरण?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजांची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली (Mumbai Breaking News) होती. याच माहितीच्या आधारावर संबंधित यंत्रणा अलर्ट मोडवक होती. दरम्यान बँकॉकवरून आलेली एक महिला हवाई गुप्तचर विभागाला संशयास्पद वाटली. त्यामुळे या महिलेची झाडाझडती घेण्यात आली होती. या झडतीमध्ये सुमारे दोन कोटी रूपयांचा गांजा (Ganja) पोलिसांच्या हाती लागलाय.

खाद्य पदार्थांचे बॉक्स आणि खेळण्यांमधून तस्करी

या महिलेच्या झडतीमध्ये तब्बल ४.२७ किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रूपये असल्याची माहिती मिळतेय. धक्कादायक बाब म्हणजे खाद्य पदार्थांचे बॉक्स आणि खेळण्यांमधून तस्करी सुरू असल्याचं समोर आलंय. या महिलेला अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीय. तिच्यावर पुढील कारवाई (Air Intelligence) सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

मुंबई विमानतळावर २ कोटींचा गांजा जप्त
Sangli Crime: सांगलीत ३ किलोंचा गांजा जप्त; एका आरोपीला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजाची तस्करी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव फिजा खान (Mumbai International Airport) आहे. ही महिला चेंबूरची रहिवाशी असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलीय. आता पोलीस या महिलेचं कनेक्शन कुठे आहे? गांजा नेमका कुणापर्यंत पोहोचणार होता? मुंबईमधून या तस्करीत आणखी कोण सामील आहे? ही महिला कोणासाठी काम करते? या सर्व बाबींचा शोध घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातून देखील अमली पदार्थ तस्करीचं आंतरराष्ट्रिय रॅकेट समोर आलं होत.

मुंबई विमानतळावर २ कोटींचा गांजा जप्त
Wardha Police : उडीसा येथून गांजा तस्करी; १०२ किलो गांज्यासह एकाला अटक, वर्धा पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com