आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत बदल होत असतात. आज सकाळी इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे. WTI क्रूड 0.21% वाढून प्रति बॅरल $ 79.88 वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड 0.21% वाढून प्रति बॅरल $ 84.20 वर व्यापार करत आहे.
भारतातील तेल विपणन कंपन्यांनी नवे दर जाहिर केले आहेत. इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरवल्या जातात. जाणून घेऊया महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग
आज महाराष्ट्रात पेट्रोलच्या (Petrol) दरात ४२ पैशांनी तर डिझेलच्या दरात ४० पैशांनी घट झाली आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत १७ पैशांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहे. जाणून घेऊया प्रमुख महानगरातील आजचे दर
1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.76 रुपये (Price) आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.86 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
2. महाराष्ट्रातील या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या
पुण्यामध्ये (Pune) पेट्रोलच्या किंमती १०६.३८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.८९ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.
नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५७ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर इतकं आहे.
नागपुरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.०६ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.६१ रुपये प्रति लिटर एवढी आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.