कोमल दामुद्रे
कोकण आणि मालवणमधील सगळ्यात आवडता आणि प्रसिद्ध पदार्थ सोलकढी
नॉन व्हेजसोबत सोलकढीची चव ही अगदी चविष्ट लागते. सोलकढी ही कोकम करी म्हणून लोकप्रिय आहे.
कोकणातील पाचक पेय म्हणून हे ओळखले जाते ही रेसिपी कशी बनवायची पाहूया.
सुक्या कोकमचे फळ आणि नारळाच्या दुधापासून ही कढी बनवली जाते. भातासोबत खाल्ली जाते.
सोलकढी बनवण्यासाठी सर्वात आधी नारळ किसून घ्या. एका प्लेटमध्ये हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे आणि धणे वेगवेगळे ठेवा.
यानंतर हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे, मीठ ठेचून कोकम कोमट पाण्यात ३० -४० मिनिटे भिजत ठेवा.
मिक्सरच्या मदतीने नारळाचे दूध आणि कोकम रस काढा. नारळाच्या दुधात मिरची पेस्ट आणि कोकम मिक्स करा.
यामध्ये आवश्यक प्रमाणात मसाले घालून वरुन पुदिन्याची पाने आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा थंडगार सोलकढी.