

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै जवळ आली आहे. पण अनेकदा पगार येत असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही Form 16 मिळालेला नाही. विशेष म्हणजे वर्षभरात नोकर बदललेल्या कर्माचाऱ्यांना हा फॉर्म उशिरा मिळण्याची शक्यता असते. पण Form 16 नसला तरी ITR भरता येतो.
ITR दाखल करण्यासाठी Form 16 महत्त्वाचा नाही. त्याऐवजी Salary Slip, Bank Statement, Form 26AS आणि Annual Information Statement (AIS) यांच्या आधारे महत्त्वाची माहिती भरता येते. वार्षिक उत्पन्न ५० लाखांपर्यंत असलेल्या करदात्यांसाठी ITR-1 हा फॉर्म लागू होतो.
ITR भरण्याआधी काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावीत. यामध्ये महिन्यानुसार पगाराची पावती, बँकेचे स्टेटमेंट, फॉर्म 26AS, AIS, बचत खातं आणि मुदत ठेवींवरचे व्याजाचे प्रमाणपत्र तसेच EPF, PPF, ELSS, NPS, आरोग्य विमा, गृहकर्ज व्याज आणि भाड्याच्या पावत्या यांसारख्या टॅक्स सवलतींचे पुरावे तुमच्याकडे असायला हवेत.
रिटर्न भरताना सर्वात आधी संपूर्ण वर्षाचे पगाराचे उत्पन्न मोजा. वर्षभरात नोकरी बदलली असेल तर सर्व नियोक्त्यांकडून मिळालेला पगार समाविष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर निवडलेल्या करप्रणालीनुसार लागू असलेल्या करसवलतींचा दावा करावा.
ITR सबमिट करण्याआधी पोर्टवरच्या Pre-filled माहिती काळजीपूर्वक तपासा. रिटर्न भरल्यानंतर ३१ जुलैआधी ई-व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. ई- व्हेरिफिकेशन केलं नाही तर ITR अवैध मानला जातो. त्यामुळे Form 16 नसला तरी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे वेळेत ITR भरून दंड आणि इतर अडचणी टाळाव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.