Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा वाढत चालला आहे. आणखी ५ लाख लाडकींना अपात्र ठरवण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana newsSaam tv
Published On
  • सोलापूरमधील सुमारे ५ लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र

  • रायगडमधील ५० हजार महिलांचे १५०० रुपये हफ्ता येणं बंद

  • ई-केवायसी, वयाची अट आणि इतर निकषांमुळे लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली

महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. राज्यभरातील जिल्ह्यांमधून अपात्र लाडक्या बहिणींची यादी समोर येत आहे. अशातच सोलापूरमधील जवळपास ५ लाख लाडक्या बहिणींना झटका बसला आहे. या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. निकषांनुसार अपात्र ठरलेल्या या लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये हफ्ता येणं आता कायमचं बंद झाले आहे.

रायगडमधील लाडक्या बहिणींना देखील मोठा झटका बसला. जिल्ह्यातील ५० हजार लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा हफ्ता येणं बंद झाले आहे. यामधील अनेक लाभर्थी महिलांचे वय ६५ वर्षे झाले असल्यामुळे त्यांचे ना योजनेतून वगळण्यात आले. या लाभार्थी महिसांना का अपात्र ठरवण्यात आले. पैसे येणं अचानक बंद झाल्यामुळे लाडकींचे टेन्शन वाढले.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

गेल्या दोन वर्षांत ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी अद्याप लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. ज्या महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण झाले आहे त्यांची नावे या योजनेमधून आपोआप वगळली जात आहेत.पण ज्या तरुणी आणि विवाहित महिलांचे वय २१ वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना या योजनेचा लाभ हवा असेल तर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे २१ वर्षे पूर्ण झालेल्या अनेक लाडक्या बहिणी चिंतेत आल्या आहेत. कारण त्यांना देखील लाभ मिळणं बंद झाले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सरकारकडून सर्व लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये पाठवण्यात आले. पण नंतर या योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. या ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक लाभार्थी महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली. त्यांचे १५०० रुपये हफ्ता येणं बंद झालं. आतापर्यंत राज्यातील ८२ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. तर उर्वरीत लाभार्थी महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana: खात्यात ₹१५०० की ३०००? लाडक्या बहिणींनो, वाचा नेमकी किती महिन्यांची रक्कम जमा झाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com