Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात; तुम्हालाही आले का? लगेच मोबाईल करा चेक

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते. या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : तक्रार आली तर.., लाडकी बहीण योजनेच्या स्क्रूटिनीबाबत आदिती तटकरेंचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे. तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल अन् तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा केले जातील.

लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली आहे. यातील काही महिलांना ५ महिन्याचे एकूण ७५०० रुपये मिळाले आहेत.तर काही महिलांना एक-दोन हप्ते मिळाले नाही. तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana Update)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ठरलं! 'या' महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणारच नाही

२१०० रुपये कधी मिळणार? (When Will Get 2100 Rupees)

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते. महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील.

Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणीच्या अर्जांची नव्याने छाननी होणार का? आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने धाकधूक वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com