महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.परंतु आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (Ladki Bahin Yojana News)
विधानसभेत महायुती सरकारला यश मिळालं आहे. महायुती सरकार जर आले तर महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर निवडून आल्यावर त्यांनी २१०० रुपये देणार असल्याचेही सांगितले होते. (Mukhyamatri Mazi Ladki Bahin Yojna)
मिडिया रिपोर्टनुसार, एप्रिल महिन्यापासून महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. तोपर्यंत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करेन. त्यानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना शिंदे गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यावर त्यांनी सांगितले की, आता महिलांना ठरल्याप्रमाणे १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. तुम्ही जो मतदानावेळी निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. आम्हाला बहुमतापेक्षाही जास्त जागा तुम्ही दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.