Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांना मिळणार की नाहीत? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana latest Update: लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. निवडणुक आयोगाच्या सूचनांनतर ही स्थगिती देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaGoogle
Published On

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिलांच्या खात्यात पुढचा हप्ता येणार नाही. आतापर्यंत महिलांना ५ महिन्याचे हप्ते देण्यात आले आहेत. त्यातील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते अॅडव्हान्समध्ये देण्यात आले आहेत. दरम्यान, आता पुढचा हप्ता येणार नसल्याच्या चर्चा होत आहेत. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक योजनांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगने दिल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडून थांबवण्यात आली आहे.

विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता महिलांना डिसेंबर महिन्यात पैसे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांना थेट डिसेंबर महिन्यात मिळू शकतो. लाडकी बहीण योजनेला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana Stop)

Ladki Bahin Yojana
Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

लाडकी बहीण योजनेला स्थगिती का? (Why Ladki Bahin Yojana Stop)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना निधी वाटप केला जातो. ज्या योजनांमधून मतदारांवर प्रभाव पडतो. त्या योजना त्वरित थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना निवडणुक आयोगाने दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. या योजनेत सध्या निधीचे वितरण थांबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला मिळणार २०००० रुपये; कसं? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com