Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! या महिलांना जुलै-ऑगस्टचा ₹३००० हप्ता मिळणार नाही, तुमचं नाव यात नाही ना?

Ladki Bahin Yojana Installment Date : लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र ई-केवायसी मध्ये अपात्र ठरलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanameta ai
Published On

Ladki Bahin Yojana Installment Date : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी अपडेट समोर आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांसाठी सरकारकडून ३१९ कोटी रूपयांचा निधी वर्ग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसा, २ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. पण राज्यातील तब्ब्ल ८० लाख महिलांना या महिन्याचा हप्ता मिळणार नाही. मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या ईकेवायसी प्रक्रियेनंतर ८० लाखांच्या आसपास महिलांचा लाभ बंद झाला आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याकडे राज्यातल्या लाखो महिलांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान ई-केवायसी प्रोसेसनंतर अपात्र ठरलेल्या महिलांचा योजनेतला लाभ बंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र पैसे नेमक्या कोणत्या दिवशी जमा होतील, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Ladki Bahin Yojana
LPG KYC Deadline Extended: LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC ची अंतिम तारीख वाढली, जाणून घ्या नवी तारीख

३१९ कोटी ५३ लाखांचा निधी वर्ग

३१९ कोटी ५३ लाखांचा निधी वर्ग जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातल्या पात्र महिलांसाठी राज्य सरकारने ३१९ कोटी ५३ लाख रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे लवकरच हप्ता येण्याची प्रोसेस सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.

Ladki Bahin Yojana
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 2% वाढ, थकबाकीसह मिळणार बंपर लाभ

हप्ता कधी मिळणार?

जुलै महिन्याचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. आतापर्यंत अर्धा ऑगस्ट महिनाही उलटून गेला आहे. तरी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकाच वेळी जमा केले जाण्याची शक्यता आहे. पण ही तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com