DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये 2% वाढ, थकबाकीसह मिळणार बंपर लाभ

DA Increase 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सिक्कीम सरकारने डीएमध्ये २ टक्के वाढ केली असून, जानेवारी २०२६ पासून थकबाकीसह लाभ मिळणार आहे.
DA Hike
DA Hike meta ai
Published On

DA Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिक्कीम सरकारने राज्यातली सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत वाढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे.

सरकारच्या या निर्णयाचा लाभ १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्माचाऱ्यांना वाढीलेल्या डीएसोबत थकबाकी म्हणजेच एकियरही मिळेल. गंगटोकमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, Dashain 2026 आधी एरियरची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. यामुळे सप्टेंबरच्या पगारासोबत एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिक्कीममध्ये यंदा Dashain उत्सव ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे.

DA Hike
LPG e-KYC Deadline : LPG e-KYC ची डेडलाइन संपली! आता सिलेंडर मिळणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA ६० टक्क्यांवर

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये, बदल केला जातो. जानेवारी २०२६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये २ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून तो ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला आहे. पण जुलै २०२६ च्या डीए वाढीची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. ही घोषणा दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे.

DA Hike
8th Pay Commission : पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी, ८ व्या वेतन आयोगात मोठा बदल होणार?

इतर राज्यांमध्येही DA वाढ

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्येही २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्येही कर्मचाऱ्यांना DA वाढीचा लाभ मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडीशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश सरकारांनी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com