

महाराष्ट्रातल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. या योजनेचा लाभ जवळपास भारतातल्या दोन लाखांहून अधिक महिला घेत आहेत. त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महिलांनी त्यांच्या खात्यात एकदा तपासणी करावी. तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या नंबर याचे मेसेज सुद्धा आलेले असतील. बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही? हे पाहता येत नाही. आता टेन्शन सोडा, पुढील पद्धतीने २ मिनिटांत तुमचे लाडकीचे पैसे आले की नाही? याची माहिती मिळवू शकता.
महत्वाची अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. येत्या २ दिवसांत सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. पण तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता यायला बराच कालावधी लागत असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने याची तपासणी करु शकता.
लाडक्या बहिणीचे पैसे चेक करण्यासाची पद्धत (How to Check Payment Status of Majhi Ladki Bahin Yojana)
फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात आला आहे. तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बॅंकेच्या अॅपवर जावं लागेल. ही ऑनलाइन पद्धत असेल. पुढे तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करावा लागेल. त्यावरुन तुम्हाला पैसे आले की नाही हे समजेल. जर तुम्हाला बॅलन्सवरुन कळत नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तपासा.
तुम्हाला यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे क्रेडिड झाले की नाही हे कळेलच. लक्षात ठेवा. जर तुम्ही ईकेवायसी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. नाहीतर तुम्हाला १५००चा हप्ता मिळेल.
ऑफलाइन पद्धत
तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने खात्यात पैसे आले की नाही? पाहायचं असेल तर ही पद्धत सुद्धा सोपी आहे. यासाठी तुम्हाला बॅंकेत जावं लागेल. मग पासबुकवर एन्ट्री करून घ्यावी लागेल. त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा हप्ता आणि बॅंकेतली एकूण रक्कम पाहता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.