Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेणार

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extend Update: लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान, ईकेवायसीसाठी अजून एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana eKYC Saam tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

ईकेवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता

महिलांनी सरकारकडे केली मागणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, अनेक महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ईकेवायसी. ईकेवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद झाले आहे. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती. त्यापूर्वी ज्या महिलांनी केवायसी केली त्यांचाच लाभ सुरु ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याचसोबत ईकेवायसीमध्ये चुका दुरुस्त केलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. आता महिलांनी ईकेवायसीची डेडलाइन वाढवण्याची मागणी केली आहे.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana : किती लाडक्या बहि‍णींना ₹१५०० चा हप्ता मिळणार? ईकेवायसीनंतर मोठी अपडेट समोर

लाडक्या बहिणींना ईकेवायसीसाठी मुदतवाढ मिळणार? (Ladki Bahin Yojana eKYC Deadline May Extend)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.याचसोबत ईकेवायसीत दुरूस्तीदेखील न केलेल्या महिलांना लाभ मिळत नाहीये. दरम्यान, सोलापूरातील जवळपास १ लाख महिलांनी ईकेवायसी केलेली नाही. त्यामुळे पात्र असतानाही या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. यामुळे महिलांनी जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करुन मुदतवाढीची मागणी केली आहे. एक संधी मिळावी, असं सांगितले आहे. परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. १५ किंवा १६ मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीत चुकीची माहिती दिली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ज्या महिलांची केवायसी बाकी आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. आम्ही पत्रव्यव्हार करुन त्यांची मागणी कळवळी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही मागणी केली जात आहे. असं अविनाश मगर, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले, याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: ₹४५००, ₹३००० की ₹१५००; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रूपये येणार? मार्च-एप्रिल अन् मे महिन्याचा हप्ता रखडला

लाडक्या बहि‍णींना ४५०० एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेत महिलांना ३ महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र देणार आहेत. केवायसीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं जात आहे.

Ladki Bahin Yojana eKYC
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! 'या' ६५ लाख लाडक्या बाहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार? महत्वाची अपडेट आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com