

लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार?
मे महिन्यात लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार?
लाडक्या बहिणींना ₹१५००, ₹३००० की ₹४५०० मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरु झाला आहे तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. जवळपास २ महिन्यासाठी हप्ता रखडला आहे. यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचा की दोन की तीन महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana March April May Installment Update)
लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडला आहे. दरम्यान, दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, अजूनही फक्त मार्च महिन्याचाही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याच्याही हप्त्याची चर्चा सुरु झाली आहे. लाडक्या बहिणींना तीन महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
लाडक्या बहिणींना ₹१५००, ₹३००० की ₹४५०० मिळणार? (Ladki Bahin Yojana Installment 1500 rupees or 3000 or 4500 Rupees Get)
लाडकी बहीण योजनेत मार्चपासूनचा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळे या तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. अजूनही हे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे आता महिलांना फक्त मार्चचे १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रुपये की मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.