Gold Rate : सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठा उलटफेर! दोन दिवसांच्या घसरणीनंतर जळगावात दरात मोठी वाढ; पाहा ताजे दर

Jalgaon gold price today : जळगावच्या सुवर्ण बाजारात दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २८ ऑक्टोबरला सोने प्रति १० ग्रॅम १,२०० रुपयांनी वाढून १.४३ लाखांव पोहोचले. सर्व दर विनाजीएसटी आहेत.
Gold Rate Today
Gold Price TodaySaam Tv
Published On: 

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Gold price today in Jalgaon : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सलग दोन दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, आज सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १,२०० रुपयांची वाढ झाली असून भाव १ लाख ४३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रतिकिलो १,००० रुपयांची वाढ झाली असून चांदी १ लाख ९८ हजार रुपयांवर आली आहे (सर्व दर विनाजीएसटी).

दसऱ्यानंतर दरात पाहायला मिळाली होती, मात्र आज पुन्हा भाव वधारल्याने बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोने– चांदीच्‍या भावात देखील चढउतार होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळेच जळगावच्‍या सुवर्ण बाजारात सातत्‍याने सोने– चांदी भावात बदल होत असल्‍याचे चित्र आहे. भावातील घसरणीमुळे चांदीचे भाव दोन लाखांच्‍या खाली आले आहेत. यानंतर देखील दोन दिवसांपासून सोने– चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाली होती. यानंतर आज भावात पुन्‍हा वाढ झाली आहे.

Gold Rate Today
अमरावती शिक्षक मतदारसंघात उलटफेर! दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये गेम फिरला, किरण सरनाईक यांचा विजय, काँग्रेसचा दारूण पराभव

सोनं १२०० रुपयांनी महागले

दरम्‍यान मंगळवारी (ता. २७) सोने एक लाख ४१ हजार ८०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. त्यात बुधवारी (ता.२८) १२०० रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ४३ हजार रुपयांवर आले आहे. तर चांदीच्‍या भावात देखील आज एक हजार रुपयांची वाढ झाली असून मंगळवारी एक लाख ९७ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेले चांदीचे भाव बुधवारी एक लाख ९८ हजार रुपयांवर आले आहेत.

Gold Rate Today
पुण्यात धक्कादायक निकाल! पदवीधरमध्ये मोठा उलटफेर, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित

काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव

तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)

२४ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००--- २ लाख २ हजार

२५ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००--- २ लाख २ हजार

२६ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार--- १ लाख ९९ हजार

२७ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ८००--- १ लाख ९७ हजार

२८ ऑक्टोबर---१ लाख ४३ हजार--- १ लाख ९८ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com