

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख उलटून १० दिवस झाले आहे. दरम्यान, आयटीआर फाइल केल्यानंतर अनेकांच्या खात्यात रिफंड जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, काही वेळा रिफंडची रक्कम खात्यात जमा व्हायला उशीर होतो. त्यामुळे करदात्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. रिफंड अडकण्यामागे काही कारणे असू शकतात. घरबसल्या रिफंडचा स्टेटस चेक करू शकता.
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यानंतर अनेकांना रिफंड मिळाले आहेत. पण यासाठी १ महिन्याचा कालावधी लागतो. अनेकांना त्याच दिवशी सुद्धा रिफंड मिळतो. त्यावेळेस रिटर्न भरल्यानंतर आयकर विभागाकडून तुमच्या रिटर्नमधल्या माहितीची पडताळणी केली जाते. पण जर तुम्ही पुढच्या ५ चूका केल्या असतील तर तुमचा रिफंड रखडण्याची शक्यता आहे.
ई-फायलिंग पोर्टलवर ‘Return Under Processing’ असा तुमचा ITR अजून प्रोसेसमध्ये आहे. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच रिफंड जारी केला जातो.
रिफंड बँक खात्यात जमा होण्यासाठी खातं ई-फायलिंग पोर्टलवर Pre-validated असायला हवं. PAN लिंक नसणे, खात्याचा नंबर किंवा IFSC कोड चुकीचा असणं यामुळेही रिफंड रखडू शकतो.
उत्पन्न, डिडक्शन किंवा बँक खात्याच्या तपशीलात चुकीची माहिती दिल्याने रिटर्न प्रोसेस अडथळा येतो. गरज असेल तर करदात्याला Revised Return सबमिट करून चूक दुरुस्त करावी लागू शकते.
तुम्ही दावा केलेला TDS आणि Form 26AS किंवा AIS मधली माहिती जुळत नसेल, तर विभागाकडून रिटर्नची पुन्हा तपासणी होऊ शकते.
काही रिटर्नची तपासणी किंवा मोठ्या माहितीतल्या चुकींमुळे स्क्रूटनीसाठी निवडले जाऊ शकतात. अशावेळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच रिफंड मिळतो. आयकर विभागाकडून नोटीस किंवा ई-मेल आल्यावर त्याला वेळेत योग्य उत्तर देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिफंडला उशीर होत असल्यास सर्वात आधी ITR स्टेटस, बँक खातं, पॅन लिंकिंग आणि TDS-AIS/26AS मधली माहिती तपासणी गरजेची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.