Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजनेत नेमका कोणाला किती मिळणार लाभ?

Government Employees : सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाकाळानुसार पेन्शन, किमान ७५०० रुपयांचा लाभ आणि कुटुंबीयांना कौटुंबिक पेन्शनची तरतूद आहे.
Pension Scheme
Pension Schememeta ai
Published On

सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सध्या चर्चेचा विषय आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ठरलेलं आर्थिक संरक्षण मिळावं, यासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना

या योजनेनुसार ज्या २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त पात्र सेवा पूर्ण झाली आहे, त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी असलेल्या सॅलरीच्या ५० टक्यांपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. मात्र, पेन्शनची रक्कम ठरवताना पात्र सेवा, शेवटचे वेतन आणि योजनेतल्या इतर नियम विचारात घेतले जातात.

Pension Scheme
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ व्या वेतन आयोगाने पगारात होणार बंपर वाढ; २.५७ फिटमेंट फॅक्टरने किती वाढेल पगार?

कोणाला पेन्शन दिली जाते?

१० ते २० वर्षांच्या सेवाकाळासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा १५ वर्षांची असून रिटायरमेंटच्या वेळी त्याची सॅलरी १ लाख रुपये असेल तर, नियमानुसार त्याला पात्रतेनुसार पेन्शन मिळू शकते.

किती पेन्शन दिली जाते?

या योजनेत किमान पेन्शनचीही तरतूद करण्यात आली आहे. १० वर्षे किंव त्यापेक्षा जास्त पात्र सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान ७,५०० रुपये मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. मात्र, पात्रता आणि प्रत्यक्ष लाभासाठी संबंधित सरकारी नियम लागू राहतील.

याशिवाय, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना कौटुंबिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांना कर्मचाऱ्याला मंजूर झालेल्या पेन्शनच्या ६० टक्के रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळू शकते.

Pension Scheme
Children Myopia : लहान वयातच मुलांना चष्मा का लागतोय? डॉक्टरांनी सांगितलेली ‘ही’ कारणं पालकांनी वेळीच जाणून घ्या

रिटायरमेंटच्या वेळी NPS मध्ये जमा झालेल्या निधीपैकी ६० टक्के रक्कम राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद असून उर्वरित रकमेचा वापर वार्षिकी (Annuity) खरेदीसाठी केला जाऊ शकतो. या माध्यमातून रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com