

ITR File Last Date: आज आयटीआर भरण्याची शेवटीची तारीख आहे. जर उद्या तुम्ही आयटीआरचा फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे काहीच तास शिल्लक आहे.
आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, जर आमचा पगार हा ३, ५, ७ किंवा १० लाख असेल तर आम्हाला आयटीआर कर लागू आहे का? देशात आयकराच्या दोन प्रणाली - 'जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था' लागू आहेत. त्यामुळे दोघांचे टॅक्स स्लॅब वेगवेगळे आहेत.
नवीन कर प्रणालीमध्ये, वार्षिक सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही आयकर (Income) घेतला जाणार नाही. नवीन कर प्रणाली अंतर्गत पाच स्लॅब आहेत. वैयक्तिक आयकराचा दर खालीलप्रमाणे आहे. 0 ते 3 लाख रुपयांच्या उत्पन्नावर शून्य कराची तरतूद आहे. 3 ते 6 लाखांच्या उत्पन्नावर (Salary) 10 टक्के, 6 ते 9 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 9 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर आकारला जाईल. 30 टक्के दर आकारला जाईल
1. डिडक्शन मिळणार नाही
नवीन कर प्रणालीमध्ये कोणतेही डिडक्शन मिळणार नाही. म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये असेल तर नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. त्यापेक्षा जास्त कमाई केल्यास तुम्हाला निश्चित दरानुसार आयकर भरावा लागेल.
2. नवीन शासन कर स्लॅब
0 ते 3 लाखांवर 0 टक्के
3 ते 6 लाखांवर 5 टक्के
6 ते 9 लाखांवर10 टक्के
9 ते 12 लाखांवर15 टक्के
12 ते 15 लाखांवर 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त वर 30 टक्के
3. जुनी कर व्यवस्था
जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. मात्र सरकार यावर 12,500 ची सूट देते. सांगायचे झाल्यास जुन्या टॅक्स (Tax) स्लॅबमध्ये तुम्हाला ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
4. डिडक्शन कसे असेल?
जुन्या कर प्रणालीमध्ये कपातीची सुविधा उपलब्ध आहे. या अंतर्गत करदात्यांना 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय 50 हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन, गृहकर्जावर दोन लाख रुपयांची सूट, एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यास 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर 75 हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
5. जुना आयकर स्लॅब
2.5 लाखांपर्यंत 0 टक्के
2.5 लाख ते 5 लाख - 5 टक्के
5 लाख ते 10 लाख 20 टक्के
10 लाखांच्या वर - 30 टक्के
6. नवीन व्यवस्था डीफॉल्ट म्हणून ठेवण्यात आली आहे
जर तुमचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये प्रवेश कराल, असे सरकारने म्हटले आहे. जर तुम्हाला जुनी कर व्यवस्थेमध्येच राहायचे असेल तर तसा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. जर तुम्ही आयकर रिटर्न भरत असाल तर तुम्हाला नवीन आणि जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.