कोमल दामुद्रे
चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत अगदी सारेच त्याची चव चाखतात.
आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांची उंची वाढावी असे प्रत्येक पालकांचे मत असते.
मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक सतत नवनवीन प्रयोग करत असतात.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का? चहा प्यायल्याने मुलांची उंची खुंटते. हे खरं आहे का? जाणून घेऊया
तज्ज्ञ सांगतात, मुलांची उंची वाढणं हे त्यांच्या अनुवांशिकत्वेवर अवलंबून असतं.
चहा प्यायल्याने मुलांच्या उंचीवर परिणाम होतो का? तर नाही असे अमेरिकेत सिद्ध झाले आहे.
चहामध्ये कॅफीन आढळते. कॅफीन मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं.
जास्त चहा पिणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
चहा प्यायल्याने पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. पोटात गॅससारखा त्रास निर्माण होऊ शकतो.
मुलांच्या झोपेचे चक्र बिघडते. तसेच पोट आणि आतड्यांसाठी हानिकारक मानले जाते