.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. सीतारामन यांनी १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्याची केली. निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारावरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. याचवेळी निर्मला सीतारामन यांनी नव्या टॅक्स बिलाची घोषणा केली.
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. निफ्टी ५१ अंकांनी घसरून २३,४५० वर पोहोचला. तर सेन्सेक्स आज १०० अंकांनी घसरून ७७,४०० वर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारावर दबाव आल्याचं दिसून आलं. पीएसयूच्या शेअरमध्येही घसरण दिसून आली. आयआरबीमध्ये ६ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. माझगाव डॉक, बीडीएल आणि एनचपीसी सारख्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी ग्रुपमधील अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनला वगळता सर्व शेअरमध्ये पडझड पाहायला मिळाली.
बीएसई सेन्सेक्सचे टॉप ३० शेअरपैकी १३ शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली. तर १७ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. या व्यतिरिक्त झोमॅटोच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांनी घसरण दिसून आली. दुसरीकडे एलएनटीच्या शेअरमध्येही घसरण पाहायला मिळाली.
एनएसईच्या टॉप ५० शेअरमध्ये आयटीसी हॉटेल्स, महिंद्र अँड महिंद्रा, बेल, अल्ट्राटेक सीमेंटच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. तर एनएसई टॉप ५० शेअरपैकी २३ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. यामध्ये हीरोमोटोकॉर्प आणि विप्रो सारख्या शेअरचाही समावेश आहे.
शेअर बाजारात एफएमसीजी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. झोमॅटोच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. तर टाटा ट्रेंट, अव्हेन्यू डीमार्ट शेअरने ७ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. गोदरेज कंज्यूमरच्या शेअरचा ७ टक्क्यांनी उसळी घेत व्यवहार होत आहे.
आयटी क्षेत्र सोडून सर्व इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सर्वात अधिक रियल्टी क्षेत्रात उसळी पाहायला मिळत आहे. या क्षेत्रात १ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. यानंतर एफएमसीजी, बँकिंग आणि अन्य क्षेत्रात तेजी पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.