रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी
रेल्वेच्या नियमानुसार लगेजचं वजन निश्चित
अतिरिक्त लगेज असल्यास कारवाई निश्चित
Indian Railways Luggage Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेने डब्यानुसार लगेजच्या वजनाबाबतही नियम निश्चित केले आहेत. रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांसाठी लगेजच्या वजनाच्या मर्यादा आखल्या आहेत. तुम्ही अतिरिक्त वजनाचं लगेज घेऊन प्रवास केल्यास दंड भरावा लागू शकतो. रेल्वे प्रवासात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी रेल्वेचे नियम जाणून घ्या.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जनरल डब्यात एक प्रवासी जास्तीत जास्त ३५ किलो वजनाच्या बॅग घेऊन प्रवास करू शकतो. स्लीपर क्लास, थर्ड एसी डब्यातून जास्तीत जास्त ४० किलो वजनाच्या बॅग घेऊन प्रवास करता येऊ शकतो.
सेकंड क्लास एसीच्या डब्यात प्रवाशांना ५० किलो आणि फर्स्ट क्लास एसीच्या डब्यासाठी ७० किलोची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तिकीट असणाऱ्यांसाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ४ जणांचं कुटुंब थर्ड एसी डब्यात प्रवास करत असेल, या कुटुंबात ५ वर्षांहून कमी वयाच्या २ लहान मुलांचा समावेश आहे. या कुटुंबाकडे १२० हून अधिक वजनाचं लगेज नसावं.
लगेजचं वजन जास्त असल्यास रेल्वेच्या दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागेल. प्रवास केलेले अंतर आणि लगेजच्या अतिरिक्त वजनानुसार दंड आकारला जाईल. रेल्वेच्या नियमानुसार, अतिरिक्त वजनाचे लगेज असल्यास पार्सल विभागाकडे नोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार, लगेज ट्रेनच्या मागील डब्यात ठेवले जाते. त्यानंतर प्रवाशांच्या गंतव्य स्थानकावर उतरवले जाते.
रेल्वेच्या जनरल डब्यातून किती वजनाचे लगेज नेऊ शकतो?
रेल्वेच्या जनरल डब्यात एक प्रवासी जास्तीत जास्त ३५ किलो वजनाचे लगेज नेऊ शकतो, अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वेच्या स्लीपर आणि 3AC मध्ये किती मर्यादा आहे?
रेल्वेच्या स्लीपर आणि 3AC डब्यात ४० किलोपर्यंत लगेज नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.