

धावत्या एक्स्प्रेसला अचानक लागली आग
डब्यातील प्रवाशांनी मारल्या घाईघाईने उड्या
अथक प्रयत्नानंतर डब्याला लागलेली आग विझविण्यात यश
तेलंगणाच्या अलेर रेल्वे स्टेशनजवळ रविवार मोठी दुर्घटना टळली. चारमीनार एक्स्प्रेसच्या कोचला अचानक आग लागली. ट्रेन स्टेशनजवळ पोहोचताच डब्याला आग लागली. त्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसच्या S5 डब्ब्याला ही आग लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेनला आग लागल्याचं पाहिलं. त्यानंतर मोटरमनशी संपर्क साधून एक्स्प्रेस थांबवली. ही एक्स्प्रेस अलेर स्टेशनजवळ तातडीने रोखून आग विझविण्यास सुरुवात करण्यात आली.
आग आणखी वाढण्याआधी प्रवासी ट्रेनमधून उतरण्यात यशस्वी झाले. या दुर्घटनेत कोणताही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वेचे इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ट्रेनला आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी आगीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रेल्वे विभागाने घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली.
अन् मोठी दुर्घटना टळली
रेल्वेच्या डब्याला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही प्रवाशांनी तातडीने ट्रेनची चैन खेचली. ट्रेन थांबल्यानंतर काही प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या. तर काही जण दरवाजातून ट्रॅकवर उड्या मारल्या. ट्रेनला रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे आणि प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करणे सोपे झाले. डब्याला लागलेली आग लवकर विझविल्याने फार पसरली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.