रेल्वे प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास 139 हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधा
पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक, डबा व सीट क्रमांकाची माहिती देणे आवश्यक आहे
रेल्वे प्रशासन पुढील स्थानकावर डॉक्टर, औषधे, प्राथमिक उपचार किंवा रुग्णवाहिकेची व्यवस्था करते.
139 हेल्पलाइनद्वारे इतर रेल्वे सेवांचाही लाभ घेता येतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करतात. मात्र प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडल्यास काय करायचं? हे आपल्याला कळतं नाही. मात्र अशा वेळी भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विशेष वैद्यकीय आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देते. कशी? जाणून घेऊया
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमची तब्बेत बिघडली तर, भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची प्रकृती अचानक खालावल्यास या क्रमांकावर संपर्क साधून तातडीची मदत मागता येते. माहिती मिळताच रेल्वे प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क करते आणि पुढील स्थानकावर आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली जाते.
मदत मिळवण्यासाठी प्रथम 139 वर कॉल करावा. त्यानंतर सूचनांनुसार पर्याय निवडून कॉल सेंटर अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. अधिकाऱ्याला पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक, डबा आणि सीट क्रमांक याची माहिती द्यावी. तसेच नेमका आरोग्याचा त्रास काय आहे, हे स्पष्टपणे सांगावे. माहिती मिळाल्यानंतर टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात येते.
परिस्थितीनुसार पुढील स्थानकावर डॉक्टर, प्राथमिक उपचार, औषधे किंवा आवश्यक असल्यास रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाते. 139 ही सेवा केवळ वैद्यकीय मदतीपुरती मर्यादित नाही. पीएनआर स्टेटस, ट्रेनची वेळ, सीट उपलब्धता, भाड्याची माहिती तसेच चोरी, छेडछाड, भांडण किंवा संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यासाठीही या हेल्पलाइनचा उपयोग करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.