IPPB Jobs : पोस्टात बक्कळ पगाराची नोकरी, पण अट फक्त एकच; पाहा कुणाला करता येणार अर्ज

India Post Office GDS Online Recruitment Update : पोस्टात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, त्यासाठी अर्ज निघाले आहेत. ३१ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, पण त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. कारण, अनुभवी लोकांना प्राधान्य देण्यात आलेय.
India Post Payments Bank recruitment 2026 Government
India Post Payments Bank recruitment 2026 ai
Published On

प्रत्येकालाच सरकारी क्षेत्रात कामात करण्याची इच्छा असते. अनेकजण यासाठी अनेक परिक्षाही देतात. पुढे इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने इच्छूक कामगारांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. त्यासाठी कोणत्या अटी आहेत? आणि शेवटची तारीख कधी आहे? याबद्दलची सविस्तर माहिती पुढील बातमीत देण्यात आली आहे.

भरतीची महत्वाची माहिती

सध्या काम शोधणं सगळ्यात अवघड झालं आहे. बऱ्याच गोष्टी डिजीटलपद्धतीने झाल्यामुळे तुम्हाला काम मिळवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही माहिती मिळवून कामाची सुवर्णसंधी मिळवू शकता.

India Post Payments Bank recruitment 2026 Government
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

कोणत्या पदासाठी भरती सुरू आहे?

पोस्टाची ही भरती मुख्य संचालन अधिकारी (CHIEF OPERATING OFFICER) पदासाठी असणार आहे. याची अंतिम तारीख ही ३१ मे असणार आहे. त्यामुळे तुम्ही पोस्टाच्या ऑफिशिअल ट्विटरवर नमूद केलेल्या माहितीवर तुमचा अर्ज भरा. ही सुवर्णसंधी गमावू नका. बॅंकेच्या या पदाची भरती प्रक्रिया ही १ मे २०२६ पासून सुरू झाली आहे.

अर्ज कुठे कराल?

तुम्ही COO पदावर काम करण्यासाठी इच्छूक असाल तर https://ippbonline.bank.in/web/ippb/current-opening या अधिकृत वेबसाईटर अर्ज करू शकता. तसेच याची वयोमर्यादा ही ४० ते ५५ वर्षे इतकी आहे. ही महत्वाची अट आहे. जर तुम्हाला उच्च पदावर बॅंकिग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही संधी गमावू नका. मुदतीआधी इच्छुकांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

लक्षात ठेवा

ही माहिती पोस्टवरील तपशीलांवर आधारित आहे. अर्ज करण्याआधी IPPB ची अधिकृत जाहिरात आणि पात्रता तपासावी. वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

India Post Payments Bank recruitment 2026 Government
kanda Batata Rassa Bhaji: आज भाजी कोणती बनवायची? १५ मिनिटांत करा बटाटा-कांद्याची रस्सा भाजी, सोपी आहे रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com