Sakshi Sunil Jadhav
वरण भातासोबत झणझणीत भाजी असेल तर तुम्ही पोटभर जेवता. पण रोजच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे.
पुढे आपण झणझणीत बटाटा-कांदा मिक्स रस्सा भाजी कशी बनवायची? हे जाणून घेणार आहोत.
पाव किलो बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे गरम मसाला, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, गरजेनुसार तेल व पाणी, चवीनुसार मीठ, १ चमचा तिखट, पाव वाटी दाण्याचे कूट, थोडा गूळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर इ.
ही रेसिपी साधारण चार जणांसाठी पुरेशी आहे. सर्वप्रथम पाव किलो बटाट्यांच्या फोडी करून घ्या. बटाटा रस्सा शोषून घेतो आणि त्याती चव सुधारते.
आता बारीक चिरलेला कांदा तेलात परता. त्याने भाजीला गोडसर आणि रुचकर चव येते.
तयार फोडणीमध्ये गरम मसाला, तिखट, हळद, हिंग आणि मोहरी घाला. याने भाजीला खास झणझणीत चव येते.
पुढे त्यात पाव वाटी दाण्याचे कूट घाला. मग त्यात थोडासा गूळ घावा. त्याने तिखट आणि मसाल्याची चव बॅलेन्स होते.
भाजीवर झाकण ठेवून ती नीट शिजू द्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
तुम्ही ही रस्सा भाजी गरम पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी किंवा साध्या वरण-भातासोबत सर्व्ह करू शकता.