India vs Canada: भारत कॅनडा वादामुळे गृहिणीचं बजेट कोलमडणार, डाळी महागणार?

India vs Canada Tension : स्वयंपाकघरातील डाळी महाग होण्याची शक्यता आहे.
India vs Canada
India vs CanadaSaam Tv
Published On: 

India vs Canada Effects :

भारत आणि कॅनडा दोन्ही देशांमध्ये काही दिवसांपासून खटके उडत आहे. दोन्ही देशांमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचा परिणाम दोन्ही देशांवर होत आहे. परंतु याचा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही देशांतील वाढत्या वादामुळे स्वयंपाकघरातील डाळी महाग होण्याची शक्यता आहे.

भारत कॅनडामधील वादाने दोन्ही देशांचे परस्पर संबंध बिघडले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागणार आहे. सर्वसामान्य लोकांना रोजच्या जीवनात महागाईचा सामना करावा लागणार आहे. या वादाचा परिणाम रोजच्या वापरातील डाळींवर देखील होणार आहे.

India vs Canada
Amazon Prime: अॅमेझॉनच्या ग्राहकांना झटका! वार्षिक प्लानसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

भारत कॅनडाकडून मोठ्या प्रमाणात मसूर डाळ विकत घेतो. कॅनडासोबतच्या वादामुळे मसूर डाळ आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत कॅनडाकडून जवळपास 4 ते 5 टन मसूर आयात करतो.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडातील वादाचा डाळींची आयात किंवा किंमतीत कोणताही फरक पडणार नाही. वरिष्ठ अधिकारी आणि व्यापारी संस्थानी यासंबंधित माहिती दिली आहे. कॅनडा-भारत वादाचा मसूरच्या डाळींवर परिणाम होण्याची शक्यता नाही.कारण भारत डाळीच्या बाबतीत विविध देशांवर अवलंबून आहे.

याशिवाय भारताने अलीकडेच अमेरिकेतून येणाऱ्या डाळींवरची कस्टम ड्यूटी हटवली आहे. यामुळे डाळीच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारत कॅनडातून मोठ्या प्रमाणावर मसूर आयात करतो. 2022-23 वर्षात 8.58 लाख टन मसूर डाळ आयात केली असून त्यातील 4.58 टक्के फक्त कॅनडातून आयात केली होती. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील वाद असाच चालू राहिला तर डाळींचे भाव आणखी महागण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप फटका बसणार आहे. देशातील विविध राज्यात मसूर डाळींचे भाव 91 ते 95 रुपये आहेत. तर चना डाळ 75 ते 80 रुपये किलो आहे.

India vs Canada
SIP with Home Loan : घरासाठी कर्ज काढताय? SIPद्वारा होमलोनचा लाभ मिळवा , जाणून घ्या कसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.