ओटीटीच्या जगात 'अॅमेझॉन प्राइम' हे मोठं नाव आहे. भारतात अॅमेझॉन प्राइमवर वेबसीरीज किंवा चित्रपट पाहण्यास प्रेक्षक प्राधान्य देतात. परंतु हेच अॅमेझॉन प्राइम पाहणे आता महागणार आहे. स्वस्त दरातील पॅकमध्ये तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागणार आहेत. अॅमेझॉन प्राइमचा हा नवीन पॅक काय आहे? याची माहिती तुम्हाला देणार आहोत.
अॅमेझॉन प्राइमने भारतात खूप कमी दिवसांत अढळ स्थान निर्माण केलं आहे. स्वस्त दरात सबस्क्रिप्शन आणि मेंबरशिप देण्यासाठी अॅमेझॉनने सर्वात पहिले पाऊल उचलले होते. परंतु अॅमेझॉनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे अॅमेझॉन प्राइम आता महागणार असून स्वस्त पॅकमध्ये जाहिराती बघाव्या लागणार आहेत.
एका वृत्तानुसार, प्राइम व्हिडिओच्या स्वस्त प्लॅनमध्ये आता जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात. नेटफ्लिक्सने याआधीच जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे. नेटफ्लिक्सप्रमाणेच आता अॅमेझॉन प्राइमही 2024 पासून जाहीराती दाखवू शकते. याची सुरुवात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा येथून होणार आहे. यानंतर इतर देशांमध्ये हा नवीन पॅक सुरू करण्यात येईल.
जर तुम्हाला अॅमेझॉन प्राइमवर जाहिरातीशिवाय वेबसीरीज किंवा चित्रपट पाहायचा असेल तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. सध्या भारतात हा नवीन पॅक लाँच होणार की नाही? याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.
नवीन पॅकसाठी द्यावे लागतील इतके पैसे
अॅमेझॉन प्राइम अॅड फ्री सब्सक्रिप्शनसाठी युजर्संना प्रत्येक महिन्याला 2.99 डॉलरपेक्षा जास्त रक्कम भरावी लागेल. सध्या महिन्याला प्राइम सबस्क्रिप्शन 14.99 डॉलर प्रति महिना आहे. तर वर्षाची मेंबरशिप 139 डॉलर आहे. पुढच्या वर्षापासून युजर्संना 14.99 डॉलरपऐवजी 17.89 डॉलर रुपये भरावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिपसाठी 139 डॉलरऐवजी 141.99 रुपये मोजावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.