टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने सुरत, गुजरात येथे त्यांच्या तिसऱ्या रजिस्टर्ड वेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ)चे उद्घाटन केले आहे. 'Re.Wi.Re - रिसायकल विथ रिस्पेक्ट' नाव असलेल्या या प्रगत केंद्राचे उद्घाटन टाटा मोटर्सचे ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. पीबी बालाजी यांच्या हस्ते करण्यात आले.
या अत्याधुनिक केंद्रामध्ये पर्यावरणदृष्ट्या अनुकूल प्रक्रियांचा वापर केला जातो आणि या केंद्राची दरवर्षाला १०,००० एण्ड-ऑफ-लाइफ वेईकल्स सुरक्षितपणे विघटन करण्याची क्षमता आहे. सर्व ब्रॅण्ड्सच्या एण्ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्स स्क्रॅप करण्यासाठी टाटा मोटर्सची सहयोगी श्री अंबिका ऑटोने आरव्हीएसएफ विकसित केले असून कार्यसंचालन देखील पाहतात. जयपूर व भुवनेश्वर येथे दोन केंद्रांना यश मिळाल्यानंतर हे तिसरे केंद्र लाँच करण्यात आले आहे आणि कंपनीच्या शाश्वत उपक्रमांसाठी आणखी एक मोठे पाऊल आहे.
या महत्त्वपूर्ण लाँचबाबत (Launch) आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्सचे ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री. पीबी बालाजी म्हणाले, ''आम्ही शाश्वततेला अधिक प्राधान्य देतो, ज्यामधून आमचा दृष्टिकोन व कृतींना चालना मिळते. आज सुरतमध्ये (Surat) Re.Wi.Re. केंद्राचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. आम्ही जबाबदारपणे एण्ड-ऑफ-लाइपु वेईकल स्क्रॅपिंगच्या परिवर्तनशील दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्या जागतिक स्तरावर प्रशंसित रिसायकलिंग प्रक्रियांच्या माध्यमातून आमचा उज्ज्वल भविष्यासाठी कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा मनसुबा आहे.
आम्हाला विश्वास आहे की, या विकेंद्रीकृत केंद्रांचा ग्राहकांना फायदा होईल, आर्थिक विकासाला चालना मिळेल, रोजगार संधी निर्माण होतील आणि पर्यावरणास अनुकूल वेईकल स्क्रॅपिंगच्या गरजेची पूर्तता होईल.''
अत्याधुनिक केंद्र Re.Wi.Re. हे सर्व ब्रॅण्ड्सच्या एण्ड-ऑफ-लाइफ पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्सचे विघटन करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले आहे, जेथे पर्यावरणदृष्ट्या अनुकूल पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पूर्णत: डिजिटल सुविधेसह सर्व कार्यसंचालने एकसंधी व पेपरलेस आहेत.
तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्टेशन्स आहेत. प्रत्येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्सच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रखर डॉक्यूमेन्टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. असे करत विघटन प्रक्रियेमधून बारकाईने लक्ष दिल्याची, तसेच सर्व घटकांच्या सुरक्षित विघटनाची खात्री मिळते. Re.Wi.Re. केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.