Can Dirty Pillows Make You Sick : अस्वच्छ उशीचे कव्हर ठरु शकते आरोग्यासाठी धोकादायक! संशोधनातून सिद्ध

Cleaning Tips : उशीचे कव्हर धुतले नाही तर तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.
Can Dirty Pillows Make You Sick
Can Dirty Pillows Make You Sick Saam Tv
Published On

Dirty Pillow Cleaning

बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण दिवसभर व्यस्त असतो त्यामुळे आपले लक्ष घराकडे कमी असते. घरातल्या माणसांसोबतच घरातील इतर गोष्टींना आपल्या पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच घरात साचलेल्या धुळीमुळे आपल्याला एलर्जी होण्याची शक्यता अधिक असते.

सणासुदीच्या काळात किंवा सुट्टीच्या दिवशी साफसफाई करतात. परंतु, ही साफसफाई वरचेवर असते ज्यामुळे बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष होते. स्वयंपाकघरापासून ते बेडरुमपर्यंतच्या प्रत्येक गोष्टींकडे आपण कानाडोळा करतो त्यामुळे आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. तुमच्या बेडरुममधील बेडशीट, उशीचे कव्हर तुम्ही महिन्यातून किती वेळा बदलता किंवा धुता. हे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही वेळच्या वेळी उशीचे कव्हर धुतले नाही तर तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.

Can Dirty Pillows Make You Sick
Amazon Great Indian Festival Sale 2023 : सणासुदीच्या काळात अ‍ॅमेझॉनचा मोठा धमाका! फोन आणि लॅपटॉप स्वस्तात, घरगुती वस्तूही मिळतील अर्ध्या किंमतीत

एका रिपोर्टनुसार, उशीचे कव्हर हे आठवड्यातून एकदा धुणे किंवा महिन्याभरात बदलणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपण रोज थकून येऊन झोपतो. तेव्हा आपला घाम, डोक्याला असणारे तेल उशीत शोषले जाते. त्यामुळे अॅलर्जी आणि त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे कधीकधी त्वचेचे इन्फेक्शनदेखील होते.

उशीच्या अस्वच्छतेमुळे आपल्याला अनेक आजार होतात. उशीचे कव्हर हे किमान ३ ते ४ दिवसांतून एकदा धुतलेच पाहिजे. लिक्विड डिटर्जंट किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करुन धुतल्याने त्यावरील जंतु नाहीसे होतात.

एका अभ्यासानुसार आपले केस, डोके आणि त्वचा ही उशीवर ठेवून आपण झोपतो. त्यामुळे उशीवर असणारे जंतु आपल्या डोक्याला चिकटतात. खूप दिवस जर उशीचे कव्हर धुतले नाही तर जंतुचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आजार जडतात. त्यामुळे उशीचे कव्हर रोज स्वच्छ करणे हे महत्त्वाचे आहे.

Can Dirty Pillows Make You Sick
Summer Care Tips : या 5 पदार्थांच्या सेवनाने शरीरात वाढते उष्णतेचे प्रमाण ! वेळीच थांबा नाहीतर जडतील अनेक आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com