Tax Saving Scheme: टॅक्स वाचवायची शेवटची संधी; बँकेची 'ही' योजना ठरणार उपयुक्त, मिळेल दीड लाखापर्यंत सुट

Fixed Deposit Scheme Of Bank: आता येत्या काही दिवसात चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे आपण टॅक्स वाचवण्यासाठी काही योजना जाणून घेऊ या.
Tax Saving Scheme
Tax Saving SchemeYandex
Published On

How To Save Income Tax

येत्या काही दिवसांमध्ये 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. आता कर वाचवण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. जर तुम्हाला यावर्षीचा कर वाचवायचा असेल तर तुम्हाला ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करावी (Tax Saving Scheme) लागेल. नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२४ पासून सुरू होत आहे. (Latest Marathi News)

बँकेची लोकप्रिय मुदत ठेव योजना टॅक्स वाचवण्यासाठी उपयुक्त (Income Tax) ठरते. मात्र, यासाठी आपल्याला ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही एकूण करपात्र उत्पन्नात दीड लाख रूपये वाचवू शकता. ही योजना सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. सामान्यत: आपल्याला मुदत ठेवींवर कर लाभ मिळत (Income Tax Saving Scheme) नाही. मुदत ठेवींमधून मिळणारं व्याज आपल्या वार्षिक उत्पन्नात जोडलं जातं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

5 वर्षांची मुदत ठेव योजना

5 वर्षांची मुदत ठेव योजना एफडी बचत योजना म्हणून ओळखली जाते. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C चा लाभ मिळतो. कलम 80C अंतर्गत, आपल्याला एकूण करपात्र उत्पन्नातून दिड लाख रुपयांपर्यंत सुट (5 Year Fixed Deposit Scheme) मिळते. 5 वर्षांची कर बचत एफडीचा पर्याय सर्व बँकांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही आपल्याला हा पर्याय सहज मिळतो. याचे व्याज दर वेगवेगळ्या बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळे आहेत.

पाच वर्षांची एफडी योजना मुदतीपूर्वी खंडित केल्यास नुकसान (How To Save Income Tax) होतं. मुदतीपूर्वी पैसे काढल्यास कर लाभ मिळत नाही आणि दंडही भरावा लागतो. जरमुदतपूर्तीपूर्वी FD मोडली, तर ती संपूर्ण रक्कम उत्पन्नात जोडली जाते. याशिवाय उत्पन्नात व्याजही जोडले जाते. यानंतर आयकर स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

Tax Saving Scheme
BMC Property Tax : BMC ने केली मोठ्या थकबाकीदारांची नावं जाहीर, मालमत्ता कर भरण्‍यासाठी ३१ मार्चपर्यंत मागितली मुदत

कलम 80सी

80C कलम आयकर कायदा 1961 चा भाग आहे. यामध्ये गुंतवणुकीच्या पर्यायांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये आपण कर सवलतीचा दावा करू (Income Tax Saving Tips) शकतो. दिर्घकालीन मुदत ठेव योजना एक चांगला बचत पर्याय आहे.

या योजनांमध्ये गुंतवणूक करून आपण कलम 80C (Fixed Deposit Scheme) अंतर्गत आपल्या एकूण करपात्र उत्पन्नापैकी दीड लाख रुपयांवर कर वाचवू शकतो. बहुतेक लोक आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांचा कर वाचला जातो.

Tax Saving Scheme
Professional Tax: तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोफेशनल टॅक्स आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com