'मालमत्ता कर' थकवणा-या मोठ्या थकबाकीदारांची नावे पालिकेने जाहीर केली आहेत. त्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेने वसुली सुरू करताच करदात्यांकडून धनादेश, धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) भरणा करण्यास सुरुवात केली आहे. तर, काही थकबाकीदारांनी ३१ मार्च पूर्वी कर भरण्यासाठी मदत मागितली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
चालू आर्थिक वर्षाचा कर आणि थकीत कर भरणा करावा यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. थकबाकी व चालू आर्थिक वर्षाचा कर वसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. करदात्यांना कर भरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करणेबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे.
मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी पालिका करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे जनजागृती केली जाते आहे. वारंवार आवाहन, मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नागरिकांनी त्यांचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२४ पर्यंत तातडीने महानगरपालिकेकडे जमा करावा, याकरिता अधिकारीवर्ग प्रत्यक्षात करदात्यांना भेटून त्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास प्रोत्साहित करत आहेत. नागरिकांना कर देयके विहित कालावधीत टपालामार्फत प्राप्त न झाल्यास महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा विभाग कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.