Tax वाचवण्यासाठी या चुका अजिबात करु नका, अन्यथा भरावा लागेल अधिकचा कर

Don't Do These 5 Mistake : कोणत्याही करदात्याला कर वाचवण्यासाठी त्याच्याविषयी अधिक माहिती असणे गरजेचे आहे. अनेकदा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने कर कमी भरावा लागतो. ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सोपे होते.
Tax Saving Tips
Tax Saving Tips saam Tv
Published On

Tax Saving Tips :

मार्च महिना जवळ आला की, अनेकांना टेन्शन येते ते टॅक्स भरण्याचे आणि वाचवण्याचे. भारतात आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपतं. त्यामुळे ज्यांना कर वाचवायचे असते त्यांचा नेमका गोंधळ उडतो.

कोणत्याही करदात्याला कर वाचवण्यासाठी त्याच्याविषयी अधिक माहिती असणे गरजेचे आहे. अनेकदा विचारपूर्वक निर्णय घेतल्याने कर कमी भरावा लागतो. ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सोपे होते. जर तुम्ही देखील टॅक्स (Tax) वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर या चुका अजिबात करु नका.

करदात्यांना 80c अंतर्गत कर वाचवण्याचा पर्याय आहे. या अंतर्गत तुम्ही PPF, ELSS, NSC आणि EPF सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करुन पैसे (Money) वाचवता येतील. कर भरताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे जाणून घेऊया

1. कर कपात

आयकर कायद्याचा कलम 80c सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)आणि कर्मचारी आयकर योजना यासारख्या कर बचत गुंतवणुकीसाठी (Investment) अनेक मार्ग आहेत. यामधून तुम्ही वर्षाला १.५ लाख रुपये वाचवू शकता.

Tax Saving Tips
Today's Gold Silver Rate : सोनं पोहचणार ७० हजारांवर? ११ दिवसांत किती रुपयांनी वाढलं, जाणून घ्या आजचा भाव

2. घरभाडे भत्ता (HRA)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगाराचा एक भाग HRA घेत असाल तर तुम्ही काही अटी समजून घेऊन भाड्यावर सूट मागू शकता. तुम्ही जर भाड्याच्या पावत्या किंवा कागदपत्रे सबमिट न केल्यास ही कर बचत गमावू शकता.

3. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम

स्वत:साठी, जोडीदारासाठी, मुलांसाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा पॉलिसींमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला 80D अंतर्गत तुम्ही कर वाचवू शकता. या कपातीची लाभ न घेतल्यास कर दायित्व वाढू शकते.

Tax Saving Tips
Petrol Diesel Rate (12th March 2024): पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

4. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एनएससी

जर तुम्हाला कर वाचवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करता येते. यामध्ये जोखीम सर्वाधिक कमी असते. यामध्ये कलम 80c अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त असतील. या अतिरिक्त कपातीचा लाभ न घेतल्याने कर बचतीच्या संधी मिळणार नाही.

5. मार्च महिन्यात टॅक्स भरु नका

अनेकांना सवय असते की, मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटच्या आठवड्यात टॅक्स भरतात. त्यामुळे आपल्याला अधिक टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी तुम्ही योग्य वेळेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला करमुक्त व्याजही मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com