मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच या महिन्यात सोन्याने नवा विक्रम केला आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मागच्या ११ दिवसांत सोनं तब्बल ३ हजाराहून अधिक रुपयांनी महागले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८० रुपयांनी वाढून ६५,६३५ रुपयांवर पोहोचली आहे. १ मार्चला सोन्याची किंमत प्रतितोळ्यासाठी ६२,५९२ रुपये इतकी होती. तर ७ मार्च रोजी सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला होता.
११ दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत ३,०४३ रुपयांनी वाढ झाली आहे. अशातच चांदीच्या किमतीत प्रतिकिलो ६९,९७७ रुपयांवरुन ७२,५३९ वर पोहोचले आहे. मागच्या वर्षभरात ८,३७९ रुपयांनी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. लवकरच सोन्याच्या भाव ७० हजारांपर्यंत पोहोचू शकते.
1. का वाढत आहे सोन्याचे भाव?
मिळालेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत येण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात वाढलेली मागणी. डॉलर इंडेक्समध्ये दिसत असेलली कमकुवतपणा आणि जगभरातील केंद्रीय बँकाचा खरेदीचा धडाका.
२०२३ च्या सुरुवातीला सोने प्रतितोळा ५४,८६७ रुपये इतके होते. परंतु ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ते १६ टक्क्यांनी वाढून ६३,२४६ रुपयांवर पोहोचले आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील सोन्याचा आजचा दर
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०८९ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,४१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)
2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)
मुंबई- ६६,२६० रुपये
पुणे - ६६,२६० रुपये
नागपूर - ६६,२६० रुपये
नाशिक - ६६,३१० रुपये
ठाणे - ६६,२६० रुपये
अमरावती - ६६,२६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.