तुम्ही नोकरी करत असाल आणि अजूनही टॅक्स भरला नसेल तर तो लवकरात लवकर भरा. टॅक्स फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. कोणत्याही खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या पगारानुसार टॅक्स कापले जाते.
व्यावसायिक कर (Tax) कोणाला भरावा लागतो? तो कधी भरला जातो? तो कोणाकडे जमा केला जातो? आणि तो का कापला जातो? यांसारखे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर संपूर्ण माहिती वाचा.
1. व्यावसायिक कर कोणाला भरावा लागतो?
व्यावसायिक कर हा विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांना भरावा लागतो. हा कर राज्य सरकारकडून ठरवण्यात आला आहे. हे उत्पन्न (Salary) करापेक्षा वेगळे आहे. तसेच तुम्ही आयटीआरमध्ये आर्थिक वर्षात भरलेल्या व्यावसायिक करावर सूट घेऊ शकता.
व्यावसायिक कर कर्मचारी, व्यावसायिक, फ्रीलान्स, डॉक्टर आणि इतर व्यवसायांमध्ये एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांना भरावा लागेल. भारतीय राज्यघटनेच्या २७६ अंतर्गत ज्या राज्यात व्यवसाय (Business) आणि रोजगाराशी संबंधित कायदा आहे त्यांना व्यावसायिक कर लादला जाणार नाही.
2. कोणत्या राज्यात व्यावसायिक कर लागू
कलम २७६ नुसार राज्यांनी लादलेला दर असल्यामुळे त्याचा दर राज्यानुसार बदलतो. कर्नाटक, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा आणि केरळमध्ये व्यावसायिक कर गोळा केला जातो.
3. पगारातून कर का कापला जातो?
खरेदी आणि खर्चाच्या व्यवसाय आणि भांडवली नफ्यावर कर आकारला जातो. तर व्यावसायिक कर हा राज्यसरकारकडून आकारला जातो. भारतातील काही राज्ये त्यांचा महसूल वाढवण्यासाठी हा कर आकारतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.