Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Neha Yadav Success Story: आयएएस नेहा यादव यांनी मोठ्या मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी नोकरी करता करता यूपीएससी परीक्षा पास केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS नेहा यादव यांचा प्रवास

नोकरीसोबत केली UPSC क्रॅक

UPSC परीक्षेसाठी टाइम मॅनेजमेंट आणि फोकस महत्त्वाचा

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवस-रात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. दिवसातील १६-१६ तास अभ्यास करावा लागतो. परंतु आपल्यासमोर अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये अनेकांनी नोकरी सांभाळत यूपीएससी परीक्षा दिली आहे. असंच काहीसं आयएएस नेहा यादव यांनीदेखील केलं. त्यांनी नोकरीसोबत यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि २०१८ मध्ये ४१४ रँक प्राप्त केली.

नेहा यांनी यूपीएससी परीक्षा देण्याआधी मेडिकल ऑफिसर पदावर कार्यरत होत्या. त्यांनी नोकरी करता करता यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केल आणि परीक्षा दिली.

Success Story
Success Story: एकदा नाही तर सलग दोनदा UPSC क्रॅक; IAS विकास मीणा यांचा प्रेरणादायी प्रवास

परीक्षेची तयारी (UPSC Preparation Tips)

नेहा यांनी सांगितले की, यूपीएससी (UPSC) परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ६-७ महिने लागले. परंतु अनेकांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. परंतु तरीही घाबरण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही. तुमचे जर बेसिक विषय क्लिअर असतील तर तुम्हाला अडचण येणार नाही.

टाइम मॅनेजमेंट (Time Management For UPSC Exam)

नेहा यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी टाइम मॅनेजमेंटवर लक्ष दिले. नोकरी करताना वेळ काढणे हे खूप कठीण असते. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करा, असं त्यांनी सांगितले.

Success Story
Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

नोकरीसोबत अभ्यास केला

नेहा यांची निवड पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी झाली होती. यावेळी त्यांच्याकडे दोन ऑप्शन होते. एक म्हणजे मेडिकल ऑफिसर आणि दुसरं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यांनी यावेळी मेडिकल ऑफिकर हा ऑप्शन निवडला. जेणेकरुन त्या नोकरी करता करता अभ्यासदेखील करु शकतील. परीक्षेआधी एक महिना त्यांनी सुट्टी घेतली होती. या काळात त्यांनी हॉस्टेलमध्ये राहून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com