Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Success Story Of IAS Anudeep Durishetty: आयएएस अनुदीप दुरीशेट्टी यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी ऑल इंडिया रँक १ प्राप्त केला आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयएएस आणि आयपीएस होण्यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. अनेकांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली आहे. आणि यूपीएससी परीक्षेची तयारी केली आहे.आयएएस अनुदीप दुरीशेट्टी हेदेखील असंच एक उदाहरण आहे. त्यांनी आयएएस अधिकारी होण्यासाठी गुगलमधील नोकरी सोडली.

अनुदीप दुरीशेट्टी यांनी २०२७ मध्ये यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक १ प्राप्त केली. त्यांनी सर्वाधिक गुण मिळवले होते. त्यांच्या याा यशाचे सर्वांनाच कौतुक आहे.

Success Story
Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

सलग तीन वेळा अपयश

अनुदीप दुरीशेट्टी यांनी एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा अपयश आले होते. त्यांनी तरीही हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आणि अखेर चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. फक्त परीक्षा पास नाही केली तर त्यांनी परीक्षेत टॉपदेखील केले. त्यांनी नवीन रेकॉर्ड केला.

अनुदीप दुरीशेट्टी हे मूळचे तेलंगणाचे रहिवासी आहेत. त्यांनी २०१७ मध्ये चौथ्या प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. अनुदीपने यूपीएससी परीक्षेत आतापर्यंत सर्वाधिक गुण ११२६ मिळवले आहे. त्यांनी सर्वाधिक गुण मिळवून रेकॉर्ड बनवला आहे.

अनुदीप यांचे शिक्षण तेलंगणामधील मेटपल्ली शहरातील श्री सुर्योदय हायस्कूल आणि श्री चैतन्य ज्युनिअर कॉलेजमधून घेतले. त्यांनी २०११ मध्ये बिट्स पिलानी, राजस्थानमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंशन इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले.

Success Story
Success Story: अभ्यासाचा ताण, आत्महत्येचा विचार, जिद्दीने तयारी केली अन् IPS झाला, अमित लोढा यांचा प्रेरणादायी प्रवास

बीटेक केल्यानंतर त्यांना गूगलमध्ये नोकरी मिळाली होती. ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यांनंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय ही परीक्षा पास केली आहे. त्यांनी फक्त इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास केला.त्यांनी २०१२ मध्ये परीक्षा दिली. २०२३ मध्ये त्यांचे आयआरएसमध्ये सिलेक्शन झाले. यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांना अपयश आले. २०१७ मध्ये अखेर त्यांनी टॉप केले.

Success Story
Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com