Success Story: ब्रेकअपनंतर थेट IAS झाला; आदित्य पांडे यांच्या निर्धाराची कथा वाचाच

IAS Aditya Pandey Success Story: मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. असंच यश आयएएस ऑफिसर आदित्य पांडे यांनी मिळवलं आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी जिद्द लागते. मेहनत, जिद्द आणि प्रचंड अभ्यास करुन तुम्ही यूपीएससी परीक्षा पास करु शकतात. ही जिद्द तुम्हाला आयुष्यात आलेल्या अपयशातून मिळालेली असते.

अनेकदा आपली परिस्थिती गरीबीची आहे. त्यातून पुढे जाण्यासाठी आणि आई वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी अनेकजण स्पर्धा परीक्षा देतात. परंतु एका तरुणाने चक्क आपले ब्रेकअप झाले म्हणून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि ती पास केली. पाटणाच्या आयएएस आदित्य पांडेची ही गोष्ट आहे. (IAS Aditya Pandey Success Story)

Success Story
Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा

यूपीएससी(UPSC) परिक्षेत ४८ वी रँक प्राप्त करुन आदित्यने आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. त्यांचे जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा त्यांनी मी स्पर्धा परीक्षा देईन, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत करुन यूपीएससी परीक्षा पास केली. आदित्य यांनी इंजिनियरिंग आणि एमबीए केले आहे. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. आदित्य यांनी दोन वेळा अपयश आहे. परंतु तिसऱ्यांदा त्यांनी घवघवीत यश मिळवले.

आदित्य पांडे शाळेपासूनच खूप हुशार होते. ते शिक्षणासाठी जामनगर येथे राहत होते. परंतु त्यांना दहावीत कमी गुण मिळाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा पाटणा येथे पाठवले. (Success Story)

Success Story
Patangrao Kadam Success Story: 'शिक्षणसम्राट ते सहृदयी लोकनेता', वयाच्या २० व्या वर्षी विद्यापीठाची स्थापना; पतंगराव कदमांचा संघर्ष साधा नाही

१२ वी पास झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या आग्रहासाठी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. परंतु लहानपणी त्यांचे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले तेव्हा ते खूप दुखी होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला सांगितले की, मी एक दिवस आयएएस ऑफिसर बनेल. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.

आदित्य यांनी २०२१, २०२२ साली यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना अपयश आलेय त्यामुळे ते निराश झाले होते. परंतु त्यांनी आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

Success Story
Success story: 2 शिलाई मशीनने सुरुवात करणारी महिला आज आहे नीता अंबानींची फॅशन डिझायनर, कोट्यवधींची मालकीण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com