

राज्यातल्या वाहनधारकांसाठी मोठा दिलासा
HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली
मुदनीनंतर नियम मोडल्यास दंड आकारणार
राज्यातल्या वाहनधारकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. हाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे. वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत परिवहन विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बाईक, कार किंवा कोणतीही वाहनं असतील तर ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तसेच याच्या नियमात बदल करण्यात आले आहे.
आता परिवहन विभागाने वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी दीड महिना वाढवून दिला आहे. तुम्हाला १ जुलै २०२६ पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवता येणार आहे. जर तुम्ही मुदतीनंतर उल्लंघन केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल.
राज्यात HSRP नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण अजुनही मोठ्या संख्येने वाहनांवर या प्लेट्स बसवलेल्या नाहीत. प्रादेशिक परिवहन क्षेत्रातल्या आकडेवारीनुसार, नोंदणीकृत २ लाख ८७ हजार ९९० वाहनांपैकी तब्बल ४७ हजारांहून जास्त वाहनांवर अजुनही HSRP प्लेट बसविण्यात आली नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण कसं होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन वाहनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, इंजिन आणि चेसिस क्रमांक त्यामध्ये टाकावा लागतो. त्यानंतर जवळच्या आरटीओ केंद्रात किंवा मान्यताप्राप्त डीलर निवडून ऑनलाइन फी भरता येते आणि नंबर प्लेट बसविण्यासाठी वेळ ठरवता येते.
वाहनधारकांकडून जिल्ह्यात HSRP बसविणाऱ्या अधिकृत केंद्रांची संख्या कमी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. काहींनी नवीन नंबर प्लेट्सच्या क्वालिटीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ही साध्या धक्क्याने प्लेट तुटते किंवा त्यावरचा रंग आणि अक्षरं काही दिवसांत फिकी पडतात अशा तक्रारी समोर आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.