

मुंबईत वाढत्या वाहनसंख्येचा विचार लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना ई-चलान देण्यासाठी तंत्रज्ञानाचा विचार करणे गरजेचे आहे. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याने चालान कापले जाते. नव्या तंत्रज्ञानामुळे ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चालान थेट ऑनलाइन जनरेट होतं आणि त्याची माहिती वाहन मालकाच्या मोबाईलवर पाठवली जाते. मात्र बऱ्याचदा नियमांचे पालन करूनही चालकाच्या नावावर चुकीचा चलान नोंदवला जातो.
तुम्ही हेच चलान काही सोप्या ट्रीक्सने रद्द करू शकता. तज्ज्ञांच्या मते, चुकीचे ई- चलान येण्यामागे अनेक कारणं असतात. त्यामध्ये नंहर प्लेट स्पष्ट न दिसणे, तांत्रिक बिघाड होणे किंवा एखाद्या दुसऱ्या वाहनाच्या नंबर ऐवजी तुमचा नंबर जाणे. अशा परिस्थितीत वाहन मालकाने घाईघाईने दंड भरण्याची गरज नसते.
जर तुमच्या नावावर चुकीचा चलान आला असेल, तर तो रद्द करण्यासाठी अधिकृत ई- चलान परिवहन पोर्टलवर तक्रार नोंदवा. संबंधित वेबसाइटवर तक्रार या पर्यायावर जाऊन चालान क्रमांक, वाहन क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर भरावा लागतो. त्यानंतर आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचा फोटो यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. चालान चुकीचा का आहे, याचे स्पष्ट कारणही तिथे नमूद करावे लागते.
तक्रार नोंदवल्यानंतर वाहतूक विभागाकडून प्रकरणाची तपासणी केली जाते. तपासणीत चालान चुकीचा असल्याचे सिद्ध झाल्यास तो रद्द करण्यात येतो आणि वाहन चालकाकडून कोणताही दंड घेतला जात नाही. याशिवाय, वाहन चालक आपल्या जवळच्या ट्रॅफिक पोलिस कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन लेखी तक्रारही दाखल करू शकतात. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर बहुतांश वेळा चुकीचा ई-चालान हटवण्यात येईल.