WhatsApp storage full: WhatsApp मुळे फोनचं स्टोरेज भरलंय? आता चॅट्स डिलीट न करता फक्त या सेटिंगच्या मदतीने रिकामी करा स्टोरेज

WhatsApp storage management: WhatsApp मुळे फोनची स्टोरेज भरली आहे? महत्त्वाचे चॅट्स डिलीट न करता मोठ्या फोटो-व्हिडीओ आणि फाइल्स कशा हटवायच्या, Manage Storage आणि Media Auto-Download सेटिंग्जचा वापर कसा करायचा जाणून घ्या.
WhatsApp storage management
WhatsApp storage managementsaam tv
Published On

स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या फोनमध्ये WhatsApp हे रोजच्या वापरातील महत्त्वाचं अॅप आहे. दिवसभरात अनेक मेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आणि व्हॉइस नोट्स WhatsApp वरून पाठवल्या आणि मिळवल्या जातात. त्यामुळे हळूहळू WhatsApp चा डेटा फोनची स्टोरेज भरू लागतो. अनेकदा फोनमध्ये ‘Storage Full’ असा मेसेजही दिसतो. यामुळे नवीन फोटो किंवा व्हिडीओ सेव्ह होत नाहीत आणि WhatsApp देखील काही वेळा स्लो होऊ शकतो.

स्टोरेज भरल्यानंतर अनेकजण जुने चॅट्स डिलीट करतात. मात्र त्यामध्ये महत्त्वाचे मेसेज, फोटो किंवा डॉक्युमेंट्सही डिलीट होण्याची शक्यता असते. पण यासाठी संपूर्ण चॅट डिलीट करण्याची गरज नाही. काही सोप्या सेटिंग्जचा वापर करून महत्त्वाचे चॅट्स न डिलीट करता WhatsApp चं स्टोरेज फ्री करता येतं.

WhatsApp storage management
WhatsApp वर तुम्हाला Block केलंय का? कसं ओळखाल? वाचा भन्नाट ट्रिक्स

WhatsApp मुळे फोनची स्टोरेज का भरतं?

WhatsApp वर येणारे फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आणि ऑडिओ फाइल्स फोनमध्ये सेव्ह होत राहतात. दिवसेंदिवस या फाइल्सची संख्या वाढत जाते आणि त्यासाठी फोनच्या स्टोरेजमधील जागा वापरली जाते. विशेषतः मोठ्या WhatsApp ग्रुपमध्ये रोज मोठ्या प्रमाणात मीम्स, फॉरवर्ड मेसेज, फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जातात. त्यामुळे अशा ग्रुपमुळे स्टोरेज खूप वेगाने भरू शकते.

WhatsApp चं स्टोरेज कसं फ्री करायचंय?

यासाठी WhatsApp मधील ‘Storage and Data’ हा पर्याय उपयोगी ठरतो. सर्वात आधी WhatsApp उघडा आणि Settings मध्ये जा. त्यानंतर Storage and Data वर टॅप करा आणि Manage Storage हा पर्याय निवडा.

या ठिकाणी फोनमध्ये WhatsApp मुळे किती जागा वापरली जातेय याची माहिती मिळते. तसंच मोठ्या आकाराच्या फाइल्सची यादीही दिसते. मोठ्या फाइल्स साधारणपणे यादीत वर दिसतात त्यामुळे जास्त जागा घेणाऱ्या फाइल्स सहज समजतात.

WhatsApp storage management
WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

यामध्ये एखादी फाइल कोणत्या चॅटमधून आली आहे आणि तिची साईज किती आहे हेही पाहता येतं. गरज नसलेले मोठे फोटो, व्हिडीओ किंवा डॉक्युमेंट्स इथून थेट निवडून डिलीट करता येतात. यासाठी संपूर्ण चॅट डिलीट करण्याची गरज नसते. त्यामुळे महत्त्वाचे टेक्स्ट मेसेज आणि बाकीचे चॅट सुरक्षित ठेवून फक्त स्टोरेज जास्त घेणाऱ्या फाइल्स काढून टाकता येतात.

‘Manage Storage’ मधील हा पर्यायही उपयोगी

WhatsApp च्या ‘Manage Storage’ सेक्शनमध्ये Forwarded Many Times असा एक वेगळा पर्यायही असतो. यात अनेक वेळा फॉरवर्ड झालेल्या फाइल्सची माहिती मिळते. यामध्ये अनेकदा अशा फाइल्स असतात ज्या वारंवार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर झालेल्या असतात आणि त्यांची आपल्याला गरज नसते. त्यामुळे या फाइल्स डिलीट केल्यास फोनमध्ये स्टोरेज मोकळं होऊ शकतं.

WhatsApp storage management
आजच WhatsApp मधील या 10 महत्त्वाच्या सेटिंग्स बदला, स्कॅमर्सचा प्रत्येक डाव ठरेल फोल

Media Auto-Download बंद करा

फक्त जुना डेटा डिलीट करून उपयोग नाही, तर पुढे अनावश्यक फाइल्स आपोआप फोनमध्ये डाउनलोड होणार नाहीत याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी WhatsApp च्या Settings मध्ये जा आणि Storage and Data हा पर्याय उघडा. यानंतर Media Auto-Download मध्ये जाऊन फोटो, ऑडिओ, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्सचे ऑटो-डाउनलोड आपल्या गरजेनुसार बंद करता येतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com