आजच WhatsApp मधील या 10 महत्त्वाच्या सेटिंग्स बदला, स्कॅमर्सचा प्रत्येक डाव ठरेल फोल

Surabhi Jayashree Jagdish

WhatsApp settingsलास्ट सीन

व्हॉट्सॲपमध्ये Settings > Privacy > Last Seen & Online या पर्यायावर जा. तिथे तुमचा लास्टी आणि ऑनलाईस स्टेटस कोण पाहू शकतो हे माय कॉन्टॅक्ट किंवा गरजेनुसार इतर पर्याय निवडून ठरवा. यामुळे अनोळखी व्यक्तींना तुम्ही कधी ऑनलाइन होता किंवा सध्या ऑनलाइन आहात का, याची माहिती मिळणार नाही.

Two-step verification | saam tv

प्रोफाईल फोटो

Settings > Privacy > Profile Photo मध्ये जाऊन माय कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडा. प्रोफाइल फोटो सर्वांसाठी ठेवल्यास अनोळखी व्यक्ती तो डाउनलोड करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा गैरवापर करू शकतात.

Chat lock | saam tv

अबाऊट सेक्शन प्रायव्हेट ठेवा

Settings > Privacy > About मध्ये जाऊन माय कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडणं अधिक सुरक्षित आहे. About मध्ये ऑफिस, शहर, व्यवसाय किंवा इतर वैयक्तिक माहिती लिहिली असल्यास ती अनोळखी लोकांपासून लपवली जाईल.

WhatsApp scam | saam tv

Read Receipts (ब्लू टीक) बंद करा

Settings > Privacy > Read Receipts हा पर्याय बंद केल्यास समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचला आहे की नाही, हे समजणार नाही. मात्र, ही सेटिंग बंद केल्यावर तुम्हालाही इतरांनी तुमचा मेसेज वाचला आहे की नाही, हे ब्लू टिकवरून पाहता येणार नाही.

Cyber security | saam tv

अनोळखी लोकांना ग्रुपमध्ये Add करू नका

Settings > Privacy > Groups मध्ये जाऊन माय कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडा. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट लीस्टमध्ये नसलेली व्यक्ती तुम्हाला थेट कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एड शकणार नाही.

Last seen privacy | saam tv

चॅट लॉक फीचर वापरा

जे चॅट तुम्हाला हवं आहे ते चॅट उघडा आणि संबंधित संपर्काच्या नावावर टॅप करून Chat Lock सुरू करा. हे फीचर सुरू केल्यावर ती चॅट फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकशिवाय उघडता येत नाही.

Read receipts | saam tv

टू-स्टेप वेरिफिकेशन सुरू करा

Settings > Account > Two-step Verification मध्ये जाऊन हा पर्याय सुरू करा आणि सहा अंकी PIN तयार करा. एखाद्याने तुमच्या मोबाईल क्रमांकाचं SIM मिळवलं तरी या अतिरिक्त PIN शिवाय व्हॉट्सॲप अकाउंट एक्टिव्ह करणं कठीण होतं. त्यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

WhatsApp online status | saam tv

Linked Devices नियमित तपासा

व्हॉट्सॲपमधील Linked Devices पर्याय वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे. WhatsApp Web किंवा इतर डिव्हाइसवर लॉगिन करून लॉगआउट करायला विसरल्यास दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या चॅटचा प्रवेश मिळू शकतो. यादीत अनोळखी डिव्हाइस दिसल्यास ते त्वरित लॉगआउट करा.

WhatsApp safety tips | saam tv

लाईव्ह लोकेशन वेळेवर बंद करा

एखाद्यासोबत Live Location शेअर केल्यानंतर काम पूर्ण झाल्यावर ते लगेच बंद करा. संबंधित चॅटमध्ये जाऊन Stop Sharing हा पर्याय निवडल्यास लोकेशन शेअर होणं थांबतं. अनेक जण लोकेशन शेअर सुरू असल्याचं विसरतात.

WhatsApp users | saam tv

प्रायव्हसी

Settings > Privacy > Privacy Checkup या फीचरचा वापर करून व्हॉट्सॲपने सुचवलेल्या सर्व सुरक्षा आणि प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा. या प्रक्रियेत विविध प्रायव्हसी पर्याय एकाच ठिकाणी पाहून आवश्यक बदल करता येतात.

Messaging app security | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Sudden Weakness | saam tv
येथे क्लिक करा