GST Rates on Electronic Items: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! मोबाईल, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त

GST Rates on Electronic Items: मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे.
GST Rates on Electronic Items
GST Rates on Electronic ItemsSaam tv
Published On

New Delhi: मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. मोदी सरकारने मोबाईल फोन, एलईडी, टीव्ही फ्रिजसहित इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी दर कमी केला आहे. यामुळे मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रिज, यूपीएस, कपडे धुण्याची मशीन या वस्तूवरील ३१.३ टक्के जीएसटी कमी करून १२ टक्के केला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहे. (Latest Marathi News)

अर्थ मंत्रालयाने ट्विट करत घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी दर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीएसटीचे दर कमी केल्याने घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दर कमी होणार आहेत.

GST Rates on Electronic Items
PM Modi Travel In Delhi Metro: अरे हे तर पीएम मोदी आहेत! सकाळी सकाळी दिल्लीकरांना सरप्राईज, पंतप्रधानांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास

स्मार्ट टीव्हीची किंमत स्वस्त होणार

मोदी सरकारने २७ इंच पेक्षा कमी स्क्रिन साइज असलेल्या टीव्हीवरील जीएसटी दर ३१.३ टक्के कमी करून १८ टक्के केला आहे. मात्र, लोकांना याचा फायदा घेता येणं शक्य नाही. कारण टीव्ही निर्माण करणाऱ्या बहुतांश कंपन्या या ३२ इंचाहून अधिक स्क्रिन साइजच्या स्मार्ट टीव्हीच तयार करतात. तर २७ इंच किंवा त्याहून अधिक इंच असणाऱ्या स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३१.३ टक्के जीएसटी द्यावा लागेल.

GST Rates on Electronic Items
Money Saving Tips: आयुष्यभरासाठी या सवयी लावून घ्या, पैशांची अडचण कधीच भासणार नाही

मोबाईल होणार स्वस्त

सरकारने मोबाईल फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने जीएसटी दरात मोठी कपात केली आहे. मोबाईल खरेदीवर आधी ३१.३ टक्के जीएसटी कर द्यावा लागत होता. मात्र, आता जीएसटी कर १२ टक्के केला आहे.

मोबाईल फोनवरील जीएसटी दर कमी झाल्याने त्याच्या मोबाईल कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी सणासुदीला मिळणाऱ्या ऑफरमध्ये कमी किंमतीत चांगला मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.

घरगुती उपकरणे होणार स्वस्त

सरकारने घरगुती इलेक्ट्रोनिक वस्तू म्हणजे फ्रिज, वॉशिंग मशीन, पंखा, कूलर, गीझर या वस्तूवरील जीएसटी कर हा ३१.३ टक्के होता, तो आता १२ टक्के इतका करण्यात आला आहे.

GST Rates on Electronic Items
Gold Silver Price : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; तपासा आजचे दर

तसेच अन्य घरगुती उपकरणे जसे की, मिक्सर, वॅक्यूम क्लीनर , एलईडी या इत्यादी वस्तूवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहे. मिक्सर,ज्यूसर सारख्या वस्तूवरील ३१.3 टक्के जीएसटी दर हा १८ टक्के करण्यात आला आहे. एलईडीवरील १५ टक्के जीएसटी दर हा १२ टक्के करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com