Delhi Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज सकाळी-सकाळी दिल्लीकरांना (Delhikar) सरप्राईज दिले. त्यांनी आज चक्क दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro) प्रवास केला. मोदींना मेट्रोमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या प्रवासादरम्यान मोदींनी मेट्रोमधील प्रवासी आणि विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या.
पीएम मोदी आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी चक्क मेट्रोतून प्रवास केला. त्यांचे दिल्ली मेट्रो प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
दिल्ली विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी मोदींना मेट्रोमध्ये पाहून प्रवासी आश्चर्यचकीत झाले. तर प्रत्यक्षात पीएम मोदींना पाहून अनेकांना आनंद झाला. मोदींत सोबत प्रवास करण्याचा त्यांनी आनंद घेतला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी हा प्रवास केला. या कार्यक्रमाला जाण्यासाठी मोदींनी चक्क मेट्रोने प्रवास केला. त्यांनी दिल्ली विद्यापीठात जाण्यासाठी लोककल्याण मार्गावरून विश्व विद्यालय स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.
पंतप्रधान मोदींनी मेट्रोच्या प्रवासाचे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले. यामध्ये त्यांनी असे सांगितले की, 'दिल्ली मेट्रोने विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रवास केला. तरुणांना आपल्या सहप्रवाशांच्या रुपाने पाहून आनंद झाला.
पीएम मोदींनी विद्यापीठापर्यंत मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट खरेदी केले. पीएम मोदी टोकनद्वारे एएफसी गेटमधून स्टेशनवर दाखल झाले. यानंतर मोदींनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह प्लॅटफॉर्मवर पोहोचले. त्यांनी इतर प्रवाशांप्रमाणे प्लॅटफॉर्मवर उभं राहून मेट्रो ट्रेनची वाट पाहिली. ट्रेन आल्यानंतर पीएम मोदी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ट्रेनमध्ये दाखल झाले. पीएम मोदींना पाहून विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी मोदींसोबत गप्पा मारत त्यांना अनुभव शेअर केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.