Money Saving Tips: आयुष्यभरासाठी या सवयी लावून घ्या, पैशांची अडचण कधीच भासणार नाही

Money Making Tips: तरुण वयात पॉलिसी खरेदी केली असेल तर त्याचे चांगले फायदे मिळतात.
Money
MoneySaam TV
Published On

Finance Tips : भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी आजपासूनच नियोजन करण्याची गरज आहे. पैशांचा अडचण भासू नये यासाठी स्वत:ला काही नियम घालून घेणे आवश्यक असते. योग्य आर्थिक नियोजन करून तुम्ही जीवनातील विविध लक्ष्य सहज साध्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यावर एक नजर टाकूया.

इन्शुरन्सचा फायदा होतो

तरुण वयात पॉलिसी खरेदी केली असेल तर त्याचे चांगले फायदे मिळतात. कारण तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो. आरोग्य विमा घेतला तर एखाद्या अडचणीच्या वेळी आजारपणात खर्चाचा भार कमी होतो. अशा परिस्थितीत विमा तुम्हाला आर्थिक संरक्षण देते.

Money
PPF Rate Hike : खूशखबर ! पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याऱ्यांना लागणार लॉटरी, सरकार वाढवू शकते व्याजदर

अनावश्यक कर्ज टाळा

घर खरेदी, कार खरेदीसाठी कर्ज घेणे योग्य आहे. क्रेडिट कार्डची सहज उपलब्ध होत असल्याने लोन अनावश्यक गोष्टींसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. कधी कदी लोक गरज नसतानाही पर्सनल लोन घेतात.मात्र अशा लोनमध्ये मोठी तुम्हाला व्याज म्हणून द्यावी लागले. त्यामुळे आर्थिक अडचण टाळण्यासाठी या सवयी टाळाव्या.

महिन्याला गुंतवणूक करा

तुमच्या महिन्याच्या उत्पनातून वाचलेले पैसे तुम्ही चांगल्या योजनांमध्ये गुंतवले पाहिजेत. बचत खाते असो किंवा बँक एफडीमध्ये फारसे व्याज मिळत नाही. महागाईवर मात करण्यासाठी, जास्त परतावा देणार्‍या स्कीम्समध्ये गुंतवणूक करा. शेअर बाजार साधारणपणे दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागारांची मदत घेऊ शकता.

Money
World Cup 2023: ओपनिंग अन् फायनल सामना गुजरातमध्ये! हॉटेल्सच्या दरात १० पटीने वाढ; किंमत वाचून आकडीच येईल

सेवानिवृत्तीची तयारी ठेवा

निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन आताच करणेही आवश्यक आहे. पीएफ खाते नसल्यास, पीपीएफ, ईएलएसएस, म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा तुमच्या पगाराचा काही भाग जमा करून एक चांगला निधी तयार करू शकता. निवृत्तीनंतर तुमच्याकडे उत्पन्नाचे नियमित स्त्रोत नसतील, परंतु नियमित खर्च वाढतील तेव्हा हा निधी कामी येईल. (Finance Tips)

ईमर्जन्सी फंड

नोकरी गेली, आजारपण किंवा एखादा अपघात आर्थिक संकट कधी येईल सांगता येत नाही. मात्र अशा आव्हानात्मक स्थितीसाठी आपण कायम तयार असणे गरजेचे आहे. त्यासाठी ईमर्जन्सी फंड तयार करणे आवश्यक आहे. ज्यामधून आपण आवश्यकतेनुसार पैसे काढू शकता. तज्ज्ञांच्या मते ईमर्जन्सी फंड किमान 06 महिन्यांच्या खर्चाइतका तयार ठेवला पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com