PPF Rate Hike : खूशखबर ! पीपीएफ व सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याऱ्यांना लागणार लॉटरी, सरकार वाढवू शकते व्याजदर

Sukanya Samriddhi Yojana Rate Hike : जर तुम्ही देखील PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
PPF Rate Hike
PPF Rate HikeSaam Tv
Published On

Saving And Investment Tips : आपल्यापैकी अनेकजण गुंतवणूकीसाठी अनेक नव नवीन पर्याय शोधत असतात. हल्ली सरकारही गुंतवणूकीसाठी अनेक योजना आखत असते. अशातच काही लोक महिन्याभराच्या खर्चातून पैसे जमावून गुंतवणूक करतात.

जर तुम्ही देखील PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होऊ शकते.

PPF Rate Hike
Gold Silver Price : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; तपासा आजचे दर

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) अर्थात पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकार खुशखबर देऊ शकते. छोट्या बचत योजनांचे व्याजदर या महिन्याच्या अखेरीस ३० जून रोजी बदलले जाणार आहेत. अर्थ मंत्रालय आता छोट्या बचत योजनांच्या (Scheme) व्याजदरांचा आढावा घेणार आहे. जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी पीपीएफचे व्याजदर (Interest) वाढवले ​​जाण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा कदाचित आज होऊ शकते.

1. अनेक वर्षांपासून दर बदले नाहीत

केंद्र सरकारने एप्रिल 2020 पासून PPF च्या व्याजदरात कोणतेही बदल केले नाही. सध्या याचे दर ७.१ टक्क्यांवर आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि सुकन्या समृद्धी योजनेसह इतर अनेक लहान बचत योजनांवरील व्याजदरात गेल्या दोन तिमाहीत वाढ करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गेल्या वर्षी मे पासून रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे की सरकारने छोट्या गुंतवणूकीवर देखील भर देऊन व्याजदर वाढवावा.

PPF Rate Hike
Rupali Bhosle : राजा मला नऊवारी साडी पाहिजे...

2. पीपीएफचा व्याजदर कसा मोजला जातो?

पीपीएफवरील व्याजदर जुलै-सप्टेंबरमध्ये वाढेल का हे जाणून घेण्यासाठी याचे व्याज कसे मोजले जाते हे आधी जाणून घ्याय. छोट्या बचत योजनांचे व्याजदर हे दुय्यम बाजारातील 10 वर्षांच्या सरकारी उत्पन्नाशी जोडलेले आहेत. केंद्र सरकार गेल्या तीन महिन्यांच्या सरकारी सुरक्षा उत्पन्नाच्या आधारे प्रत्येक तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांची पुन्हा पाहाणी करते.

PPF Rate Hike
Life Insurance Buying Guide: योग्य जीवन विमा कसा निवडाल ? योजना निवडताना या गोष्टींकडे दुर्लक्ष नकोच !

3. PPF व्याजदर वाढणार?

पीपीएफचे व्याजदर निश्चित करण्यासाठी एक सूत्र आहे जे 2016 मध्ये वित्त मंत्रालयाने अधिसूचित केले होते. या अंतर्गत, PPF वर 10 वर्षांच्या बाँडच्या उत्पन्नापेक्षा 25 बेसिस पॉइंट अधिक व्याज दिले जाते. सध्या बाँडचे उत्पन्न ७.३ टक्के आहे. या सूत्राच्या आधारे पीपीएफचे व्याजदर ७.५५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​पाहिजेत.

शहरी आणि ग्रामीण भागात सामान्य नागरिकांना पीपीएफ सारख्या बचत योजनांमध्ये सुरक्षित म्हणून गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील चढ-उतारांपासून लांब राहण्यासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यावर अवलंबून असतात. तसेच कर वाचवण्यासाठीही गुंतवणूक करतात. पीपीएफची लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी सरकारवर व्याजदर वाढवण्याचा दबावात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com